IPL 2027 Retention : मोठ्या खेळाडूंना धक्का ; बोल्ट,स्टार्कसह अनेक दिग्गज खेळाडू रिलीज

IPL 2027 Retention : आयपीएल 2027 साठी सर्व 10 आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
IPL 2027 Retention

IPL 2027 Retention : आयपीएल 2027 साठी सर्व 10 आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी बीसीसीआयकडून आज (17 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यांतचा वेळ देण्यात आला होता. आयपीएल 2027 साठी ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज खेळाडूंना संघातून रिलीज करण्यात आले आहे. मथीशा पथिराना आणि ट्रेंट बोल्ट यांनाही संघातून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला आहे.

सीएसकेने महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्याने त्याला रिलीज केला आहे. तसेच 18 कोटी रुपयांचे मूल्य असलेला मथीशा पथिराना आणि 18 कोटी रुपयांत सनरायझर्स हैदराबादमध्ये असलेला ट्रॅव्हिस हेड यांनाही संघातून रिलीज करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सने 12.5 कोटी रुपयांच्या ट्रेंट बोल्टला, तर दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी रुपयांच्या मिचेल स्टार्कला संघातून रिलीज केले आहे. 11 कोटी रुपयांचे मूल्य असलेला शिमरॉन हेटमायरही आता त्याच्या फ्रँचायझीचा भाग राहिलेला नाही.

आरसीबीने जेकब बेथेलला रिलीज केले

लखनऊ सुपर जायंट्सने आवेश खानला संघातून काढून टाकले आहे, जो 9.75 कोटी रुपयांत संघाचा भाग होता. मुंबई इंडियन्सने 9.25 कोटी रुपयांच्या दीपक चहरला, तर तुषार देशपांडेला (ज्याचे मूल्य 6.5 कोटी रुपये होते) संघातून रिलीज केले आहे. आरसीबीच्या बाबतीत सांगायचे तर, त्यांनी 2.6 कोटी रुपयांच्या जेकब बेथेलला संघातून मुक्त केले आहे. सीएसकेने प्रशांत वीरला रिलीज केले चेन्नई सुपर किंग्सने मेगा लिलावादरम्यान प्रशांत वीरला 14.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता फ्रँचायझीने त्याला संघातून रिलीज केले आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडून 6 प्रमुख खेळाडू मुक्त

दिल्ली कॅपिटल्सने 6 दिग्गज खेळाडूंना संघातून रिलीज केले आहे. यामध्ये मिचेल स्टार्क, नितीश राणा, दुश्मंथा चमीरा, करुण नायर आणि पाथुम निसांका यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अभिषेक पोरेललाही संघातून रिलीज करण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सनेही चार महत्त्वाच्या खेळाडूंना संघातून रिलीज केले.

राजस्थान रॉयल्सने तुषार देशपांडे, शिमरॉन हेटमायर, ॲडम मिल्ने आणि क्वेना माफाका यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना संघातून रिलीज केले आहे. त्यांची मूल्ये 11 कोटी रुपये, 6.5 कोटी रुपये, 2.4 कोटी रुपये आणि 4.5 कोटी रुपये इतकी होती.

रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी

MI: ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, ए. एम. गझनफर, अथर्व अंकोलेकर, केशव महाराज, मोहम्मद इझार, दानिश मालेवार, मयंक मार्कंडे, मयंक रावत

CSK: एम. एस. धोनी, मॅट हेन्री

RCB: मंगेश यादव, जेकब बेथेल, रिचर्ड ग्लीसन

GT: इशांत शर्मा, मार्क वूड, कुलवंत खेजरोलिया, शाहरुख खान, कॉनर एस्टरहुझेन

KKR: रहाणे, आकाश दीप, ब्लेसिंग मुझाराबानी, दक्ष कामरा, लवनीत सिसोदिया, एम. पथिराना, मुस्तफिजुर रहमान, नवदीप सैनी, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, तेजस्वी सिंग, उमरान मलिक

वेळूचे विक्रम शिंदे छत्रपती शिवाजी महाराज युवा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित-

RR: ॲडम मिल्ने, क्वेना माफाका, तुषार देशपांडे, कुलदीप सेन, युद्धवीर सिंग, विग्नेश पुथुर, रवी सिंग, शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर

follow us