मी त्याच्या कानाखाली वाजवेल…! असे काय झाले की Kapil Dev पंतवर संतापले?

मी त्याच्या कानाखाली वाजवेल…! असे काय झाले की Kapil Dev पंतवर संतापले?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) हा गेल्या काही दिवसांपूर्वी कार अपघाताचा बळी ठरला होता.या अपघातात पंत यांचे प्राण वाचले, मात्र ते गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेवरून भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) हे ऋषभ पंतवर चांगलेच संतापले आहे. कपिल देव म्हणाले की, ऋषभ पंत पूर्णपणे बरा झाल्यावर मला त्याच्या कानाखाली वाजवायची आहे.

दरम्यान 30 डिसेंबर रोजी पंत यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातानंतर पंतवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शस्त्रक्रिया संपल्यानंतर पंतला त्याच्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितले की, पंतला त्या जीवघेण्या अपघातात झालेल्या दुखापतीतून बरे होताच मी त्याच्या कानशिलात लगावणार आहे.

कपिल देव म्हणाले, पंतच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ अडचणीत आला आहे. जसा पालकांना आपल्या मुलांनी चुका केल्या तर त्यांना कानशिलात लगावण्याचा अधिकार आहे, तसेच कपिलला पंत बरे झाल्यावर तेच करायचे आहे.

कपिल देव म्हणाले, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे जेणेकरून मी जाऊन त्याच्या कानाखालात मारेल व त्याला स्वतःची काळजी घेण्यास देखील सांगू शकेन. तुझ्या अपघातामुळे संपूर्ण टीम तुटली आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो पण मलाही त्याचा राग येतो. आजच्या तरुणांकडून अशा चुका का होतात? यासाठी त्याला ही शिक्षा देणे गरजेची आहे.

तसेच पुढे बोलताना कपिल देव म्हणाले, प्रथम आशीर्वाद, त्याला जगातील सर्व प्रेम मिळो, देव त्याला चांगले आरोग्य देवो. पण त्यानंतर, मुलांनी चूक केल्यास त्यांना चापट मारणे ही पालक म्हणून जबाबदारी आहे.

नेमकं काय घडलं होत
पंत हा आपल्या घरी जात असताना महामार्गावर त्याच्या कारचा भीषण अपघात झाला होता. रस्ता अपघातानंतर त्यांच्या कारला आग लागल्याने पंत चांगलाच जखमी झाला होता. 25 वर्षीय ऋषभ वेळेतच गाडीतून बाहेर पडला आणि त्याचा जीव वाचला. मात्र, या अपघातामुळे तो बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. तो आयपीएल 2023 मधून बाहेर पडणार हे निश्चित आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube