Junior National Carrom Championship: मुलांमध्ये महाराष्ट्र संघाची बाजी

Junior National Carrom Championship: मुलांमध्ये महाराष्ट्र संघाची बाजी

मुंबई : राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. दादर येथील स्काऊट हॉल येथे झालेल्या 47 व्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत (Junior National Carrom Championship) महाराष्ट्राच्या मुलांनी यश मिळवलं आहे.

18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भाच्या संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. महाराष्ट्राच्या मिहीर शेखने विदर्भच्या सुरज गायकवाडवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 17-5, 6-21 आणि 17-11 असा चुरशीचा विजय मिळवला.

तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या कौस्तुभ जागुष्ठेने विदर्भच्या ए. आय. यासिनला 21-5, 1-18 आणि 16-14 अशी मात दिली. दुहेरी लढतीत महाराष्ट्राच्या अथर्व पाटील / एस. आर. रफिक जोडीने विदर्भच्या जी. समुद्रे / एस. रेहान जोडीला 18-2, 25-0 अशा फरकाने नमवत महाराष्ट्राच्या संघाला 3-0 असा विजय मिळवून दिला.

मुलींच्या सांघिक गटात बलाढ्य तामिळनाडूच्या संघाने महाराष्ट्रवर 3-0 असा विजय नोंदवून अंतिम विजेतेपद मिळविलं. तामिळनाडूच्या एच. आविष्काराने महाराष्ट्राच्या दीक्षा चव्हाणवर 18-3, 21-1 असा विजय नोंदवला.

तर तामिळनाडूच्या एम. खझिमाने महाराष्ट्राच्या केशर निर्गुंवर 13-11, 21-0 अशी मात केली. दुहेरी लढतीत तामिळनाडूच्या वि मित्रा / सुपर्णा जोडीने महाराष्ट्राच्या श्रुती वेळेकर / ज्ञानेश्वरी इंगुळकरवर 24-0, 12-14 आणि 21-7 असा विजय मिळवून बाजी मारली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube