ODI World Cup 2023 : विकेटकीपर म्हणून रिषभच्याऐवजी ‘या’ खेळाडूची निवड होणार
Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत याला मैदानात उतरायला आणखी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातच यावर्षी भारतामध्ये एकदिवसीय वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे या वर्ल्डकपपासून ऋषभ पंत हा लांब राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे भारतीय संघ विकेटकीपर म्हणून केएल राहुल व इशान किशन या दोन खेळाडूंची संघात निवड करु शकतो.
बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिपोर्टनुसार ऋषभची तब्येत सध्या ठीक होते आहे. पण त्याला चालण्याासाठी व स्ट्रेचिंग करण्यासाठी आणखी 6 ते 7 महिने लागतील. आमचे हेच म्हणणे आहे की, त्याची तब्येत लवकर बरी व्हावी व त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावे. त्याला क्रिकेटमद्ये पुनरागमन करण्यास थोडा वेळ जाईल. त्यामुळे आम्ही विकेटकीपर म्हणून राहुल इशान यांचा नावाचा विचार करत आहोत.
धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…
ऋषभ पंत याचा डिसेंबरमध्ये अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो थोडक्यात वाचला होता. एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तो घरी आला होता. त्याला आपल्या गुडघ्याची सर्जरी देखील करायला लागली होती. सध्या त्याची तब्येत बरी होत आहे. काही दिवसांपूर्वीच तो राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीत आला होता. तेव्हा त्याने माझी तब्येत बरी असून माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे त्याने सांगितले आहे.