PAK vs SL : फायनलमध्ये टीम इंडियाला श्रीलंकेची टक्कर; पाकिस्तान आऊट !

PAK vs SL : फायनलमध्ये टीम इंडियाला श्रीलंकेची टक्कर; पाकिस्तान आऊट !

PAK vs SL : आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2023) सुपर 4 फेरीतील सामन्यात श्रीलंकेने दमदार खेळ करत पाकिस्तानचा पराभव (PAK vs SL) केला. या पराभवाबरोबरच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले असून फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न देखील भंगले आहे. आता या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारत पाकिस्तान नाही श्रीलंका टीम इंडियाला टक्कर देताना दिसेल. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. 42 ओव्हरमध्ये 252 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसनमोर 252 धावांचे लक्ष्य होते. श्रीलंकेने मात्र या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि पाकिस्तानला स्पर्धेतूनच आऊट केले.

Prithvi Shaw Injury: पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या; आणखी किती महिने क्रिकेटपासून दूर राहणार?

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाला 20 धावांवरच पहिला झटका बसला. सलामीवीर कुसल परेरा 17 धावा काढून बाद झाला. त्यानंतर संघाच्या 77  धावा झालेल्या असताना दुसरी विकेट पडली. पथुक निसांका 29 धावांवर बाद झाला. यानंतर पुढील विकेट घेण्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. पुढील विकेट पडली तेव्हा संघाच्या 210 धावा झाल्या होत्या. कुसल मेंडिस 91 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पुढील विकेट 222 धावांवर पडली. कॅप्टन दासुन शनाका विशेष काही करू शकला नाही. फक्त चार धावा काढून तो तंबूत परतला. दुसऱ्या बाजूला चारिथ असलंका उभा होता. त्याने शेवटच्या बॉलवर संघाला विजय मिळवून दिला.

याआधी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 42 ओव्हरमध्ये 252 धावा केल्या होत्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेला 253 धावांचे लक्ष्य देण्यात आले. श्रीलंकेकडून पाथिरानाने तीन मदुशनने दोन विकेट घेतल्या. तिक्ष्णा आणि वेल्लालगे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हॉकीमध्ये पाकिस्तानला धक्का, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद गमावले

फायनलमध्ये श्रीलंका-भारत भिडणार

या पराभवानंतर पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. टीम इंडियाने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता फायनल सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होईल. हा सामना येत्या 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube