शेतकऱ्याचं पोर ते धोनीप्रमाणे रेल्वेत TC; भारताला कास्य जिंकून देणाऱ्या स्वप्नीलचा प्रेरणादायी प्रवास

  • Written By: Published:
शेतकऱ्याचं पोर ते धोनीप्रमाणे रेल्वेत TC; भारताला कास्य जिंकून देणाऱ्या स्वप्नीलचा प्रेरणादायी प्रवास

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये  ( Paris Olympics) कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं देशाला कास्य पदक मिळवून दिलं आहे. स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) असं सातासमुद्रापार भारताचा तिंरगा फडकवणाऱ्या नेमबाजाचं नाव. स्वप्नीलच्या या मोठ्या गवसणीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले आहे. सातासुमद्रापार मराठी पोराचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे याचाच घेतलेला हा आढावा.

माझ्या मुलाने तिरंगा फडकावत ठेवला; स्वप्निलच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना

कोण आहे स्वप्नील कुसळे?

6 ऑगस्ट 1995 रोजी पुण्यात जन्मलेला स्वप्नील कुसळे हा शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. 2009 मध्ये स्वप्नीलचा नेमबाजीतील प्रवास सुरू झाला, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला मराराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.2013 मध्ये त्याला लक्ष्य स्पोर्ट्सकडून प्रायोजकत्व मिळाले.

धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट कलेक्टर

स्वप्नील हा भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीप्रमाणे भारतीय रेल्वेत तिकिट कलेक्टर म्हणून कार्यरत असून, तो मुळचा कोल्हापूरजवळील कांबळवाडी गावातील असून, तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

जिद्दीला सलाम! सात महिन्यांची गरोदर असताना ऑलिम्पिकमध्ये सहभागी; जगभरातून कौतुकाचा वर्षाव

स्वप्नीलची आतापर्यंतची कामगीरी कशी?

स्वप्नीलने आतापर्यंत नेमबाजीत अनेक पदकांना गवसणी घातली आहे. कुवेत येथे 2015 आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये त्याने 50 मीटर रायफल प्रोन 3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त, त्याने गगन नारंग आणि चैन सिंग सारख्या प्रसिद्ध नेमबाजांना हरवून तुघलकाबाद येथे 59 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा जिंकली आहे. एवढेच नव्हे तर, त्याने तिरुअनंतपुरम येथील 61 व्या राष्ट्रीय स्पर्धेत 50 मीटर रायफल 3-पोझिशन स्पर्धेत सुवर्ण पदकही पटकावले आहे.

पुण्यात जन्मलेल्या या नेमबाजाने 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि बाकू येथे 2023 विश्वचषक स्पर्धेत मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदकांसह वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. तसेच 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सांघिक स्पर्धेत कांस्यपदक आणि नवी दिल्ली येथे 2021 विश्वचषक स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube