राजस्थानची विजयी सलामी, चहलने रचला विक्रम

राजस्थानची विजयी सलामी, चहलने रचला विक्रम

हैदराबाद : राजस्थानने 16 व्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली आहे. हैदराबादचा (SRH) 72 धावांनी पराभव करत राजस्थानने (RR) सिझनची विजयी सलामी दिली आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने 20 षटकात 203 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादला 131 धावा करता आल्या.

या सामन्यात 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद (SRH vs RR) संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात शून्यंवर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीच्या रूपाने 2 महत्त्वाचे विकेट गमावल्या. यानंतर मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूक या जोडीने पहिल्या 6 षटकात सावध फलंदाजी करत संघाची धावसंख्या 30 धावांपर्यंत नेली.

मात्र, सतत धावगती वाढवण्याचे दडपण हैदराबादच्या फलंदाजांवर दिसून येत होते आणि त्यामुळेच हॅरी ब्रूक 13 धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. इथून पुढे राजस्थानच्या गोलंदाजांनी सतत अंतराने विकेट्स घेत पूर्ण दबाव निर्माण केला. 48 धावसंख्येपर्यंत हैदराबादचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

छत्रपती संभाजीनगर घोषणेचा जनक कोण? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतच सांगितलं…

या सामन्यात हैदराबाद संघाला 20 षटक संपल्यानंतर 8 विकेट गमावून केवळ 131 धावा करता आल्या, अब्दुल समदने संघाकडून सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. दुसरीकडे, राजस्थानकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहलने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर ट्रेंट बोल्टने 2 आणि जेसन होल्डर, अश्विनने 1-1 बळी घेतले.हैदराबादविरोधात झालेल्या सामन्यात चहल याने टी 20 क्रिकेटमध्ये 300 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. असा विक्रम करणारा चहल पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय.

राजस्थानडून जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने पहिल्या विकेटसाठी झटपट 85 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. बटलर आणि यशस्‍वी या दोघांकडून 54 धावांची उत्‍कृष्‍ट खेळी पाहायला मिळाली. यानंतर राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसननेही 32 चेंडूत 55 धावांची खेळी केली. याशिवाय शिमरॉन हेटमायरने अखेरच्या षटकात 16 चेंडूंत 22 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात टी नटराजन आणि फझलक फारुकी यांनी 2-2 विकेट घेतल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube