RCB vs RR: पर्यावरण जागृतीसाठी आरसीबी हिरव्या जर्सीत उतरली मैदानात
RCB vs RR: IPL च्या 16 व्या मोसमात, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा संघ राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या त्यांच्या 7व्या लीग सामन्यात त्यांच्या पारंपारिक लाल रंगाच्या जर्सीऐवजी हिरवी जर्सी घालून मैदानात उतरला. या सामन्यात संघाचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने नाणेफेकीच्या वेळी विरोधी संघाचा कर्णधार संजू सॅमसन याला एक रोप दिले आणि पर्यावरणाबाबत सर्वांना जागरूक करण्याचा संदेशही दिला.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ 2011 पासून प्रत्येक मोसमात हिरव्या जर्सीमध्ये एक सामना खेळतो. यावेळी त्याने 23 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला. ‘गो ग्रीन’ उपक्रमांतर्गत खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेंगळुरू संघाच्या खेळाडूंनी परिधान केलेल्या जर्सीचा स्टेडियममध्ये जमा झालेल्या कचऱ्याचा पुनर्वापर करून तयार करण्यात आला आहे.
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक
स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या कचऱ्याबद्दल सांगायचे तर, आरसीबीने या हंगामातील पहिला सामना खेळला तेव्हा एकूण 19488 पाण्याच्या बाटल्यांसह 9047.6 किलो कचरा स्टेडियममध्ये जमा झाला होता. सुमारे 8 टन सुका कचरा, अन्न कचरा आणि इतर साहित्याचा पुनर्वापर करून या जर्सी तयार करण्यात आल्या आहेत.
हिरव्या जर्सीमध्ये संघाचे रेकॉर्ड खराब
RCB संघाने 2011 च्या मोसमापासून आतापर्यंत हिरवी जर्सी परिधान करून एकूण 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त 3 सामने जिंकता आले आहेत, तर 7 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.