Video : भर मैदानात कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या मारली कानाखाली; चॅहत्यांनी केली ‘ही’ मागणी

Rinku Singh and Kuldeep Yadav Video : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. (Kuldeep Yadav) दिल्लीला जिंकण्यासाठी 205 धावा करायच्या होत्या. पण त्यांना फक्त 190 धावाच करता आल्या. दिल्लीला 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, सामन्यानंतर, मैदानावरील एक मजेदार किस्सा समोर आला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जेव्हा कुलदीप यादवने रिंकू सिंहला दोन कानाखाली वाजवल्या. तेव्हा रिंकू सिंह देखील नाराज झाल्याचा पाहायला मिळाला.
नेमकी केव्हा व कशी घडली घटना
केकेआर विरुद्ध डीसी यांच्यातील सामना संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू पोस्ट प्रेझेंटेशनसाठी उभे असताना ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीपमध्ये, कुलदीप, रिंकू आणि इतर काही खेळाडू सामना संपल्यानंतर एकमेकांनी बोलताना व हासताना दिसले. पण अचानक लेग स्पिनर कुलदीपने रिंकूला जोरदार कानाखाली वाजवली.
काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय
क्षणभर असं वाटलं की हे कदाचित दोघांमध्ये मजाक चालू असावी. पण पुन्हा एकदा कुलदीपने रिंकूला दुसरी देखील चापट मारली. त्यानंतर मात्र, रिंकूला हे आवडले नाही, त्याचा चेहरा गंभीर झाला, तो रागाने कुलदीप कडे पाहत होता. यानंतर कुलदीपने त्याला पुन्हा थप्पड मारली. कुलदीप तिसऱ्यांदा त्याला मारणार मात्र त्याने त्याचा चेहरा मागे घेतला. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओ क्लीपवर आता रिंकू सिंहच्या चाहत्यांनी कमेंट देणे सुरू केले आहे. कुलदीप यादवर बंदी आणली जावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. तर असे वर्तन योग्य नाही, असे म्हणत काही लोकांनी कुलदीपवर निशाणा साधला.
काय म्हणाला अक्षर पटेल?
सामन्यानंतर अक्षर पटेल याने प्रेझेंटेशन कार्यक्रमात संवाद साधला. तो म्हणाला की, मला वाटते की विकेट चांगली होती आणि पॉवरप्लेमध्ये आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे आम्ही १५-२० धावा जास्त दिल्या. आम्ही काही विकेट सहज गमावल्या. पॉवरप्लेनंतर आम्ही त्यांना कसे रोखले ही चांगली गोष्ट होती. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, काही फलंदाज अपयशी ठरले असले तरी, आमचे २-३ फलंदाज चांगले खेळले, असेही तो म्हणाला. अक्षर पटेल पुढे म्हणाला, फलंदाजी करत असताना आम्हाला जिंकण्याची अपेक्षा होती. जर आशुतोष असता तर तो पहिला गेम पुन्हा खेळू शकला असता.
केकेआर विरुद्ध डीसी यांच्यातील सामना संपल्यानंतर रिंकू सिंह अॅन्ड कुलदीप यादव व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये कुलदीप यादने रिंकू सिंहच्या कानाखाली मारल्याचं दिसतय.@imkuldeep18 @rinkusingh235 #IPL2025 #KKRvsDC pic.twitter.com/hU5CdpPdFu
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 30, 2025