रोहितची टॉसची हॅट्रिक, प्रथम फलंदाजीचा निर्णय; प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल
IND vs AFG T20I Series : 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघ आज अखेरचा T20 सामना खेळत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs AFG) अंतिम सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत.
रोहित शर्माने अष्टपैलू अक्षर पटेल, यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला तिसऱ्या टी-20 साठी वगळले आहे. यष्टिरक्षक संजू सॅमसन, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांना संधी दिली आहे. मात्र, तिसऱ्या टी-20 मधून बाहेर असलेला अक्षर पटेल दुसऱ्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता.
ICC T20I Ranking : टॉप-10 मध्ये यशस्वी जैस्वाल; अक्षर पटेलचीही ‘गरुडझेप’
अफगाणिस्तानचे प्लेइंग इलेव्हन – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.
मालदीवची ट्रीप कॅन्सल करा अन् ‘छोले भटूरे’ची ट्रीट घ्या; उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाची ऑफर
भारताचे प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.