मराठी चाहत्यांची सचिनला अनोखी भेट; वाढदिवसाच्या दिवशी घडवले देवाचे दर्शन

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T181449.350

Sachin Tendulkar 50th BirthDay :  भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत असे अनेक विक्रम केले, जे येत्या काही वर्षांत मोडणे अशक्य वाटते. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकरला राजकीय क्षेत्रासह देशातील सर्वच मोठं – मोठ्या लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनवर आज देशातूनच नव्हे तर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सोशल मीडियावरील एका मराठी इन्फ्लूएन्सरने सचिनला खास सरप्राइज देत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होते आहे.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

मराठमोळ्या करण सोनवणे अर्थात Focusedlndian ने सचिनसोबतचा आपला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिनचे चाहते अगदी एखाद्या लहानमुलाप्रमाणे त्याच्या भोवती वावरताना दिसत आहेत. यावेळी करणने सचिनकडून खास पद्धतीने ऑटोग्राफ देखील मिळवला आहे. हा व्हिडीओ सचिनच्या प्रत्येक फॅनला भावूक करणारा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Sonawane (@focusedindian)

या व्हिडीओत नील सालेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे असे सर्व मराठी इन्फ्लूएन्सर दिसत आहेत. त्यांनी सचिनची स्टुडिओमध्ये जाऊन भेट घेतली आहे. या सर्वांसोबत सचिननेदेखील मराठीमध्ये संवाद साधला आहे. हे सर्व लोक मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत.

Happy Birthday Sachin : राज ठाकरेंनी दिल्या सचिनला हटके शुभेच्छा, असाच…

करणने या व्हिडीओला असे कॅप्शन दिले आहे की, आता माझ्या वडिलांकडे हसण्यासाठी सर्वात भारी कारण आहे. सचिन सरांचे धन्यवाद. शिवाय, आता सचिन सरांनाही समजलं असेल देव कसा दिसतो, असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर सचिनच्या चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Sachin Tendulkar : अंजली मेहता कशा झाल्या मास्टर ब्लास्टरच्या होम मिनिस्टर, जाणून घ्या लव्हस्टोरी…

Tags

follow us