अर्जुनच्या जर्सी नंबर-24 च्या मागे सचिनचे खास नाते

  • Written By: Published:
अर्जुनच्या जर्सी नंबर-24 च्या मागे सचिनचे खास नाते

Sachin And Arjun Relationship Behind ‘s Jersey Number-24 : टी – 20 लीगमध्ये दोन गोष्टींसाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. एक म्हणजे विराट कोहलीचा संघ बंगलोर ट्रॉफी कधी जिंकणार तर पहिला आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन टी – 20 लीगमध्ये पदार्पण कधी करणार. गेल्या दोन मोसमात त्याला पदार्पण करता आले नव्हते. आता रविवारी अर्जुनला त्याची टी – 20 लीग कॅप कोलकाता विरुद्ध त्याच वानखेडे स्टेडियमवर मिळाली जिथे सचिन शेवटची कसोटी खेळला होता.

सूर्यकुमार यादवने पहिलेच षटक अर्जुनला दिले

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माकडून कॅप घेतल्यानंतर अर्जुन मैदानात उतरला तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या. रोहितच्या जागी कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच षटकात अर्जुनकडे चेंडू सोपवला हे थोडे आश्चर्याचे होते. नवोदित खेळाडूंकडे सहसा कोणी पहिले षटक देत नाही, पण सूर्याने आत्मविश्वास दाखवला.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

अर्जुनने 24 नंबरची जर्सी घातली होती

बॉल हातात घेऊन अर्जुन रनअपसाठी लांब पल्ले घेत असताना कॅमेरा त्याच्या पाठीकडे होता. अर्जुनने 24 नंबरची जर्सी घातल्याचे येथे दिसून आले. भारतीय क्रिकेटमध्ये 10 नंबरची जर्सी ग्रेट बनवणाऱ्या सचिनच्या मुलाने हा नंबर का निवडला? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता फक्त अर्जुनच नाही तर सचिनचा देखील या नंबरशी विशेष संबंध असल्याचं दिसून आलं.

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात

अर्जुनने 24 नंबर का निवडला?

अर्जुन आणि सचिन या दोघांचा 24 तारखेला वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला, तर दुसरीकडे अर्जुनचा जन्म 24 सप्टेंबर 1999 रोजी झाला. कदाचित याच कारणामुळे अर्जुनने 24 नंबरची जर्सी निवडली. विशेष म्हणजे सचिनने 2009 मध्ये कोलकाताविरुद्ध त्याच्या टी – 20 लीग कारकिर्दीतील पहिले षटक टाकले आणि 5 धावा दिल्या. दुसरीकडे अर्जुननेही कोलकाताविरुद्ध कारकिर्दीतील पहिले षटक टाकले. त्यानेही केवळ 5 धावा खर्च केल्या.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

या सामन्यात अर्जुनने दोन षटके टाकली आणि 17 धावा दिल्या. मात्र, त्याला फलंदाजी मिळाली नाही, तर त्याला अद्याप फलंदाजीत पदार्पण व्हायचे आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईने कोलकात्याचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कोलकाताने व्यंकटेश अय्यरच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 185 धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात मुंबई संघाने 186 धावा केल्या आणि 17.4 षटकात सामना जिंकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube