Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत
नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) काही दिवसांपूर्वीत निवृत्तीची घोषणा केली होती.
शेवटचे ग्रँडस्लॅम (Grand Slam) खेळत असलेल्या सानिया मिर्झाला ऑस्ट्रेलियन ओपन 2023 (Australia Open 2023) महिला दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे.
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत पराभूत झाली आहे. या महिला दुहेरी जोडीला बेल्जियमच्या अॅलिसन व्हॅन उटवांक आणि युक्रेनच्या अॅनहेलिना कॅलिनिना यांनी 4-6, 6-4 आणि 2-6 अशा फरकाने पराभूत केले.
सानियाने आपले शेवटचे ग्रँडस्लॅम खेळताना हंगेरीच्या दल्मा गाल्पी आणि बर्नार्डा पेरा यांचा 6-2, 7-5 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सानिया भलेही महिला दुहेरीतून बाहेर पडली असेल, पण तिचा ऑस्ट्रेलियन ओपनचा प्रवास सुरूच आहे. सानिया आणि रोहन बोपण्णा या जोडीने मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे.
सानिया आणि बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन वाइल्ड कार्ड एंट्री जेमी फोरलिस आणि ल्यूक सॅव्हिल यांचा 6-3 असा पराभव केला.
तिने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपन 2016 दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
यापूर्वी 2015 मध्ये तिने यूएस ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या होत्या. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपन 2009 ची मिश्र दुहेरी ही जिंकली होती. फ्रेंच ओपनमध्येही तिने भारताचं नाव मोठं केलं आहे.