Sanjay Singh यांची हकालपट्टी केली; कुस्तीपटूंसमोर सरकार झुकलं, पण कारणं वेगळीच..
Sanjay Singh : कुस्तीपटूंनी अखेरची निर्वाणीची विनवणी केली. कुस्ती सोडली, पद्मश्री परत केला. पण या लढ्याला अखेर यश आलं असं म्हणावं लागेल. कारण पहिलवांनांच्या अश्रुंनंतर सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि लैंगिक शोषणाचे आरोप झालेले ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांची निकटवर्तीय असलेले भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. खेळाडूंना यश मिळालं असलं तरी या निर्णयाच्या दुसऱ्या बाजूची देखील तेवढीच सध्या चर्चा सुरू आहे. कारण गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळत नव्हतं. मग यावेळी हा निर्णय एवढा तात्काळ का घेतला गेला? सरकारला खेळाडूंचं म्हणणं पटलं की हा सरकारचा नाईलाज आहे. अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे…
धनंजय मुंडे कोरोनाच्या विळख्यात; इतर मंत्र्यांनाही धास्ती!
कारण ही लढाई सुरू झाली. ती म्हणजे भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांनी कुस्ती संघाचे तब्बल बारा वर्षे अध्यक्ष राहिले. मात्र भारतीय कुस्तीपटून कडून ब्रिजभूषण यांच्यावर महिला पहिलवानांचा लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले गेले. त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली गेली. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये या खेळाडूंनी दिल्लीतील जंतर-मंतर या मैदानावर धरणे आंदोलन केलं. त्यावर सरकारने केवळ खेळाडूंना न्याय देण्याचा आश्वासन दिलं. हे प्रकरण बंद झालं. त्यानंतर चार महिने उलटून देखील यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे एप्रिल 2023 मध्ये या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आवाज उठवला. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात देखील सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. त्यामुळे खेळाडूंनी थेट त्यांची आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेली पदक आणि पुरस्कार गंगेमध्ये विसर्जित करण्याचं इशारा दिला. त्यावरही सरकारने कोणती पावलं उचलली नाही.
अजितदादांनी शरद पवारांना पुन्हा डिवचले ! मी साठीनंतर निर्णय घेतलाय, तुम्ही तर…
त्यानंतर नुकतीच कुस्ती संघाची निवडणुक पार पडली. निवडणुकीची प्रक्रिया जुलैमध्येच सुरू झाली होती. परंतु प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यास विलंब झाला होता. मात्र यामध्ये देखील खेळाडूंना धक्काच बसला कारण लैंगिक शोषणाचे आरोप असलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांना जरी पदावरून दूर करण्यात आलं असलं तरी देखील यावेळी विजय त्यांचाच झाला होता. कारण ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असलेले संजय सिंह यांची कुस्ती संघाचे अध्यक्षपदी वर्णी लागली होती.
मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात
त्यानंतर कुस्तीपटूंनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत या निवडीचा कडाडून विरोध केला. तर ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिकने थेट धाय मोकलून रडत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तर बजरंग पुणियाने पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर थेट फुटपाथवर आपला पद्मश्री पुरस्कार ठेवून दिला. खेळाडूंच्या या आक्रमक भूमिकेनंतर सरकार अखेर नमल आणि संजय सिंह यांच्यासह कुस्तीसंघाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली.
>Pune Lok Sabha 2024 : ‘ …तर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार’; सुनिल देवधरांची घोषणा
मात्र या निर्णयामुळे अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. की, गेल्या वर्षभरात खेळाडूंच्या लढाईला यश येत, नव्हतं मात्र यावेळी सरकारने एवढ्या घाईने निर्णय का घेतला? यामागचं कारण सांगितलं जातंय की, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या दरम्यानच हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. कारण बहुतांश कुस्तीपटू आणि कुस्ती हा खेळ हरियाणा राज्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे खेळाडूंना दुखावणे आणि संजय सिंह यांना पदावर ठेवणे हे निवडणुकीमध्ये भाजपच्या मतदारांना डायव्हर्ट करणारं ठरलं असतं आणि त्यामुळेच क्रीडा मंत्रालयाकडून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.