IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून टी20 सामना रंगणार
मुंबई : भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेला 27 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. वनडेमध्ये क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडिया टी-20 मालिकेतही विजयी मालिका कायम ठेवण्याकडे लक्ष देईल.
मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. पहिला T20 सामना (IND vs NZ T20) रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे खेळवला जाईल. टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे असेल. दोन्ही संघांमधील पहिला सामना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.
सामन्यांचे वेळापत्रक
पहिला सामना : ठिकाण – रांची | 27 जानेवारी, संध्याकाळी 7 वा
दुसरा सामना : ठिकाण – लखनौ | 29 जानेवारी, संध्याकाळी 7 वा
तिसरा सामना : ठिकाण – अहमदाबाद | 1 फेब्रुवारी, सायंकाळी 7 वा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीनही टी-20 सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. याशिवाय डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय दूरदर्शनचे खेळ डीडी फ्री डिशवरही पाहता येतील.
भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी. , पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.
न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), जेकब टफी, लॉकी फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.