T20 World Cup 2026 ची आजपासून सुरुवात, टीम इंडिया रचणार इतिहास?
T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 ची आजपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स दरम्यान होणार आहे.
T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 ची आजपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स दरम्यान होणार आहे. 35 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 39 ग्रुप सामने होणार आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होणार आहे. आयसीसीने 20 वेगवेगळ्या देशांना संधी दिली आहे आणि संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे, प्रत्येक गटात पाच संघ आहेत. टी20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांची यादी:
ग्रुप अ: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया.
ग्रुप ब: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान.
ग्रुप क: इंग्लंड, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, नेपाळ, इटली.
ग्रुप ड: न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई.
टी20 विश्वचषक वेळापत्रक
टी20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 8 मार्च रोजी संपेल. ग्रुप टप्प्यात एकूण 39 सामने खेळले जातील आणि प्रत्येक ग्रुपमधील अव्वल दोन संघ पुढे जातील. त्यानंतर सुपर 8 सामने होतील. उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील, तर टी20 विश्वचषक 2026 च्या विजेतेपदासाठी अंतिम सामना 8 मार्च रोजी होईल.
आज तीन सामने
टी20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या दिवशी तीन प्रमुख सामने होतील. ग्रुप अ मध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांचा सामना सकाळी 11 वाजता होईल. स्पर्धेतील दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात खेळला जाईल. ग्रुप क मधील हा सामना दुपारी 3 वाजता कोलकाता येथे खेळला जाईल. ग्रुप अ मधील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होईल, जो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
भारत –अमेरिका व्यापार कराराची अधिकृत घोषणा; 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या सर्वकाही
भारतीय संघ तयार
भारतीय संघ 2026 च्या टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यासाठी फेव्हरिट असल्याचे दिसून येते. गेल्या दोन वर्षांत संघाने एकही मालिका गमावलेली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली आहे. कोणीही सलग दोनदा टी20 विश्वचषक जिंकलेला नाही आणि टीम इंडिया इतिहास रचण्याच्या उद्देशाने स्पर्धेत प्रवेश करेल.
