IND vs AUS 3rd Test : भारताचा डाव केवळ 109 धावांवर आटोपला, कुहमन आणि लायनची मोठी कामगिरी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T134749.454

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यामध्ये सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर आटोपला. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकल्याचं दिसून आले. कारण या पहिल्या डावामधेच सर्वच्या सर्व विकेट्स या ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी घेतले आहेत. तर यामध्ये मॅथ्यू कुहनेमनने सर्वात जास्त ५ तर नॅथन लायनने ३ आणि मर्फीने १ विकेट घेतली आहे. टीम इंडियाचा एक गडी धावचीत झाला आहे. तर विराटने २२ तर शुभमनने २१ या सर्वाधिक धावा केल्या.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असणाऱ्या या पिचवर भारतीय फलंदाज काही चांगली कामगिरी करु शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सुरुवातीला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांच्याकडे चेंडू सोपवला होता. पण टीम इंडियाचा फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली.

IND vs AUS 3rd Test : आजपासून इंदूरमध्ये रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट मॅच

यामुळे कर्णधार स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवला, टीम इंडिया ढासळताना दिसली. एकही विकेट न गमावता २७ धावा केल्यावर टीम इंडियाने पुढील १८ धावांत ५ विकेट गमावले आहे. यानंतर पुढे कशातरी १०० पार धावा टीम इंडियाने केल्या आणि ३३.२ षटकांत १०९ धावांवर भारताचा संपूर्ण डाव आटोपला. दिल्ली कसोटीतून रेड- बॉल क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ २ विकेट मिळाल्या होत्या.

IND vs AUS 3rd Test : आजपासून इंदूरमध्ये रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट मॅच

आपल्या दुसऱ्या कसोटीत कुहनेमनने पहिल्या ४ षटकांतच टीम इंडियाला ३ मोठे धक्के देत एका डावात ५ विकेट्स घेण्याचा मान मिळवला. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला १२ धावा तर यष्टिमागे झेलबाद केलं. यानंतर त्याच्या पुढील षटकात सलामीवीर शुभमन गिलला २१ धावा पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला ० वर बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या खेळाडूंना अखेरच्या फळीत महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतले. शिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा १ धाव आणि रवींद्र जाडेजा ४ धावा आणि केएस भरत १७ धावा या विकेट्स घेतल्या आहेत. तर मर्फीने विराटची २२ धावा केल्यानंतर मोठी विकेट घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube