भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना आज रंगणार
नवी दिल्ली : नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघ पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. कर्णधार रोहित शर्मा अनफिट आहे, त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आली आहे.
रोहित व्यतिरिक्त, विराट कोहली आणि केएल राहुल देखील टी-20 मालिकेत दिसणार नाहीत. दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि राहुल एकदिवसीय मालिकेत खेळणार आहेत. भारतीय संघ नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करून ‘मिशन 2024’ साठी मजबूत पाया घालण्याचा विचार करेल.
टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याच्या हाती आहे, अशा परिस्थितीत तो श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात योग्य निर्णय घेऊन आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवेल. अशा परिस्थितीत कर्णधार हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला संधी देणार नाही.
T20 कधी खेळला जाईल? : सामना 3 जानेवारी (मंगळवार) रोजी होणार आहे.
T20 कोठे खेळवला जाईल? : वानखेडे स्टेडियम, (मुंबई )
T20 किती वाजता सुरू होईल? : संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक 6:30 वाजता होईल.
T20 चे थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
लाइव्ह स्ट्रिमिंग : डिस्ने हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल.