भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या पहिला टी-20 सामना

  • Written By: Published:
India Vs Sri Lanka T20 Series Live Streaming 96681162

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईत होत आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत पोहोचला आहे. 2023 मध्ये टीम इंडियाची ही पहिली मालिका आणि पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल.

अशा स्थितीत भारतीय संघ या नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्या टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. उभय संघांमधील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा पांड्यावर मोठी जबाबदारी आली आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धची शेवटची टी-20 मालिका जिंकली होती. यावेळी भारताचा सामना आशिया कपमधील चॅम्पियन संघाशी होणार आहे, जो सध्या फॉर्मात आहे.

श्रीलंकेचा संघ प्रीमियर लीग खेळल्यानंतर भारतात येत आहे. लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश आहे. तर भारताने आपल्या सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊन युवा संघ निवडला आहे. पांड्या कर्णधार असेल तर सूर्यकुमार यादव उपकर्णधारपद सांभाळेल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या मंगळवारी 3 जानेवारी रोजी मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल तर सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाणार आहे.

Tags

follow us