फोन फिरवणार तेवढ्यात वाटलं नेम चुकला तर….; नेम चांगलायच्या चर्चांमध्ये ठाकरेंचं स्पष्टीकरण

  • Written By: Published:
फोन फिरवणार तेवढ्यात वाटलं नेम चुकला तर….; नेम चांगलायच्या चर्चांमध्ये ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : माझा नेम चांगलाय हल्ली सगळेच जण बोलतात असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा वेळ साधली आहे. यावेळी त्यांनी निशाणा धरला आणि उद्धव ठाकरेंनी नेम धरला आणि ठाकरेंचा नेम चुकला असं होऊ नये म्हणून फोन केला नसल्याचे सांगितले. ते मुंबईत आयोजित पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेच्या सत्कार सभारंभात बोलत होते. (Uddhav Thackeray On Swapnil Kusale)

Sanjay Pandey: ‘जनहित’ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा पक्ष अन् चिन्ह ठरलं!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत एक सिल्व्हर अन् 5 रौप्य पदक पटकावली. यात कोल्हापूरच्या मराठामोठ्या स्वप्नील कुसळेचाही (Swapnil Kusale) समावेश आहे. स्पप्नीलच्या दमदार कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वप्नीलला फोन केला नव्हता. आपण फोन का केला नाही यावर ठाकरेंनी या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले आहे.

निशाणा लागताच ठाकरेंनी नेम धरला अन्…

कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले की, ऑलिम्पिकमधील मेडल ही काही सोपी गोष्ट नाही. सर्वच मेडलचं एक एक महत्त्व असतं. पण ऑलिम्पकिचं मेडल हा एक वेगळा मान असतो. आम्ही तर आपले खेळाडू कसे खेळत असतात हे टिव्हवर बघत असतो असे ठाकरे म्हणाले. या मेडल महत्त्व टेनिसच्यावेळी पाहल्याचे सांगत जोकोविचने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत पण, ऑलिम्पिक जिंकल्यानंतर त्याची भावन वेगळी होती. कोणत्याही स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना अचूक नेम धरण हे खरच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला तुझा अभिमान असल्याची कौतुकाची थाप ठाकरेंनी स्वप्नीलच्या पाठीवर मारली.

Maharashtra Politics : राज्यात 2019 ची पुनरावृत्ती! निवडणुकांचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा डिसेंबरमध्ये?

फोन फिरवणार तेवढ्यात वाटलं नको…

यावेळी ठाकरेंनी स्वप्नीलला पदक मिळाल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी फोन नंबर मिळवला. त्याला फोन फिरवणार तेवढ्यात मनात विचार आला की, उद्या पेपरमध्ये बातमी यायची निशाणा धरला अन् उद्धव ठाकरेंचा फोन यायचा आणि नेम चुकला म्हणून मी तुला फोन न करता तुझ्या बाबांना फोन केल्याचे ठाकरेंनी स्वप्नीलला सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube