विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी! सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले, वनडेत केला नवा पराक्रम

IND vs NZ ODI 1st ODI Virat Kohli Records; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Virat Kohli breaks two Sachin Tendulkar records in the 1st ODI against New Zealand

Virat Kohli breaks two Sachin Tendulkar records in the 1st ODI against New Zealand: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या दमदार फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे, या सामन्यात विराटने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले. याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला. विराटने या सामन्यात 51 चेंडूंत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या.

शिवसेना सुनावणीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; खोक्यांचं राजकारण जनतेने पाहिलंय

विराटचे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराटने अवघ्या 35 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 8 चौकार आणि एक षटकार लगावला. वनडे कारकिर्दीतील हे त्याचे 80 वे अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे, विराटच्या वनडे कारकिर्दीतील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरा येथे त्याने 34 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. आजही ते त्याचे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

धावांचा पाठलाग करताना सचिनला टाकले मागे

विराटने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम मोडला. वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे. त्याने आतापर्यंत 180 सामन्यांतील 169 डावांमध्ये 8,741 धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 242 सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना 8,720 धावा केल्या होत्या.

पोलिसांसाठी ACP भिडले, पण स्वतःच सस्पेंड झाले; दिल्ली पोलीस दल गाजवणाऱ्या वशिष्ठ प्रकरणाची स्टोरी

विराटची सचिनवर मात

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांना एकत्रितपणे SENA देश म्हटले जाते. या देशांमध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करण्याच्या बाबतीतही विराटने सचिनला मागे टाकले. न्यूझीलंडविरुद्धच्या अर्धशतकासह विराटने या देशांमध्ये अशी कामगिरी 134 वेळा केली आहे. तर सचिनच्या नावावर 133 अर्धशतकी किंवा त्याहून मोठ्या खेळींची नोंद आहे.

13 हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज

विराटने या सामन्यात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 13 हजार धावांचा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 12 धावा पूर्ण करताच त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 13,685 धावा केल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर… बोरिवली बेस्ट डेपोतीलमधील अतिक्रमणे हटवली

अशा प्रकारे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून देत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

follow us