विराटचं द्विशतक हुकलं; ऑस्ट्रेलियाला भारतानं धुतलं
अहमदाबाद : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) धावांचा अक्षरशः डोंगरच रचला आहे. विराटच्या आयुष्यात मागील तीन वर्षांपासून धावांचा दुष्काळ दिसत होता, पण आज विराटनं त्याची कसर भरुन काढली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) शानदार 186 धावा झळकावल्या आहेत. आज विराटनं आपल्या कारकिर्दीतील 75 वं शतक असून 28 वं कसोटी शतक आहे. विराटनं दीडशतक (A century and a half)केल्यानंतर विराटच्या चाहत्यांकडून दोन शतकांची (Double Century)अपेक्षा वाटत होती. पण विराटला दोन शतकांची खेळी करता आली नसली तरी विराटनं मोठी धावसंख्या केली आहे. भारतानं 571 धावा बनवल्या आहेत. तर 91 धावांनी आघाडी घेतली आहे.
विराटनं 23 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटीत शेवटचं शतक झळकावलं होतं. कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत विराटच्या बॅटमधून शतक झळकलं आहे. आता 3 वर्षे 3 महिण्यांनंतर विराटनं कसोटीत आज शतक झळकावलं आहे.
माधुरी दीक्षितचं आई स्नेहलतासोबत होतं मैत्रिणीसारखं नातं
विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमधील हे 28 वं शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटनं सातव्यांदा तीन आकडी धावसंख्या गाठली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 75 वेळा शतकी खेळी केली आहे. चौथ्या दिवशी उपाहारानंतर विराटने 241 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. विराटनं आपले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 5 चौकार मारले. त्याने सर्वाधिक धावा विकेटच्या मध्यभागी धावून काढल्या.
विराटची बॅट तीन वर्षांपासून कसोटीत पूर्णपणे शांत होती. त्यानं 2020 मध्ये 19.33 च्या सरासरीनं 116 धावा, 20201 मध्ये 28.21 च्या सरासरीनं 536 धावा आणि 2022 मध्ये 26.5 च्या सरासरीनं 265 धावा केल्या आहेत. विराटला त्याच्या शेवटच्या 15 डावांमध्ये अर्धशतकही करता आलं नव्हतं. या वर्षाची सुरुवात विराटसाठी चांगली झाली नाही. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात विराटनं 111 धावा केल्या होत्या. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीमुळंही तो त्रस्त होता.