आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सेहवागचा समावेश, प्रथमच भारतीय महिला क्रिकेटरचाही बहुमान

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सेहवागचा समावेश, प्रथमच भारतीय महिला क्रिकेटरचाही बहुमान

ICC Hall of Fame: भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), भारताची महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी (Diana Edulji) आणि श्रीलंकेचा अरविंदा डी सिल्वा (Arvinda de Silva) यांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) समावेश करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी या तिघांना सन्मानित केले जाईल. 2007 चा T20 आणि 2011 चा एकदिवसीय असे दोन विश्वचषक विजयांमध्ये सेहवागने महत्त्वाची भूमिका बजावली.

वीरेंद्र सेहवागचा विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये बदलत्या फलंदाजीचे श्रेय वीरेंद्र सेहवागला जाते. कसोटीत आधीचे फलंदाज चेंडूला विकेटकीरकडे सोडून जुना करायचे, तिथे सेहवाग फटकेबाजी करून चेंडू जुना करायचा, हे सूत्र त्याने लागू केले. त्याने भारतासाठी 104 कसोटी, 251 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 17,000 हून अधिक धावा केल्या आहेत. कसोटीत दोन त्रिशतके झळकावणाऱ्या चार फलंदाजांपैकी तो एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याचे द्विशतक आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना 2013 मध्ये खेळला होता.

IND vs NZ Semifinal: टीम इंडियाच्या 9 सामन्यात 75 विकेट आणि 2300 हून अधिक धावा

अरविंदा डी सिल्वानेही विश्वचषक जिंकला
अरविंदा डी सिल्वाने श्रीलंकेसाठी 93 कसोटी आणि 308 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2003 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्याने 15,645 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा केल्या आणि 135 विकेट घेतल्या आहेत. 1996 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या विजयात त्याचा मोठा वाटा होता. त्याने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध अर्धशतक आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद शतक झळकावले होते.

IND VS NZ : सेमीफायनलला पाऊस आल्यास काय? रिझर्व्ह डे की, डकवर्थ-लुईस रूल; जाणून घ्या…

एडुलजी पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू
डायना एडुल्जी यांनी 17 वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले आणि ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला आहे. त्यांनी भारतासाठी 20 कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि अनुक्रमे 63 आणि 46 बळी घेतले आहेत. 1993 च्या विश्वचषकानंतर जेव्हा त्या निवृत्त झाला तेव्हा फक्त लिन फुलस्टनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त विकेट घेतल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube