चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते खेळाडू पांढरे जॅकेट का घालतात?, काय आहे यामागील आयसीसीची भावना

Champions Trophy winners wear white jackets : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील (Trophy) अंतिम सामना जिंकून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने 252 धावांचे लक्ष्य गाठून दमदार विजय मिळवला तर किवी संघाचे चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. भारताने किवी संघासोबत आपली जुनी धावसंख्याही सेटल केली. 25 वर्षांपूर्वी टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.
विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय कर्णधाराने ट्रॉफी उचलली. यापूर्वी भारतीय संघाला विजयानंतर पांढरे जॅकेट देण्यात आले होते. टीम इंडियाचे खेळाडू पांढरे जॅकेट परिधान करून एकामागून एक आले आणि ट्रॉफी उचलली. यामागेही एक कारण आहे.
टीम इंडिया चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद
टीम इंडियाला पांढरे जॅकेट का दिले जातात? पराजीत संघाला असे जॅकेट का मिळाले नाही. शेवटच्या वेळी 2017 मध्ये पाकिस्तानी संघालाही पांढरे जॅकेट घालायला मिळाले होते. विजेत्या संघाचे खेळाडू पांढरे जॅकेट का घालतात. त्याचं कारण काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
पांढरे जॅकेट चॅम्पियन संघाला का दिले जाते?
पांढरा कलर हा धोरणात्मक उत्कृष्टता, दृढनिश्चय आणि यशाचा वारसा दर्शवते. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर असं म्हटलं आहे की, पांढरे जाकीट चॅम्पियन संघासाठी सन्मानाचे चिन्ह आहे. हे धोरणात्मक प्रतिभेच्या अथक प्रयत्नाचे आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा वारसा दर्शवते. त्याच कारणाने विजेत्या संघाला हे जॅकेट घातलं जातं.
आयसीसीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अक्रमने या स्पर्धेचा वारसा सांगितला होता. आठ संघांच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीबद्दलही त्यांनी भाष्य केले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेत्या संघाला ट्रॉफीसह पांढरा ब्लेझर दिला जातो. याची सुरूवात २००९ मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर प्रत्येक वेळी विजेत्या संघाच्या खेळाडूंना हा ब्लेझर घातला जातो.
२०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरचे फोटो टीम इंडियाच्या चाहत्यांच्या मनात अजूनही ताजे आहेत. पण हे ब्लेझर फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर का देतात? आयसीसीच्या मते, प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो आणि हा पांढरा कोट याचेच प्रतिनिधित्व करते. या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना परिपूर्ण असलेल्या संघात पराभूत करत चॅम्पियन्स होण्याचा सन्मान मिळवतात, म्हणून विजयी संघाला हा कोट दिला जातो. यामुळेच आयसीसी प्रत्येक चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याला सामन्यानंतर सादर करते आणि संघ केवळ ट्रॉफीसाठीच नाही तर प्रतिष्ठित पांढऱ्या कोटसाठी देखील खेळतात.