पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल? रोहित ‘यांना’ दाखवणार बाहेरचा रस्ता
अहमदाबाद : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर शेवटचा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला आपल्या संघात काही बदल करू शकते.
भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 मध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल, तर अहमदाबाद कसोटी सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मात्र, संघाला तसे करण्यात यश आले नाही, तर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
अहमदाबाद कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल निश्चित मानला जात आहे तो म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन. इंदूर कसोटी सामन्यात शमीला विश्रांती देण्याचा निर्णय घेत संघ व्यवस्थापनाने उमेश यादवचा त्याच्या जागी समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.
केएल राहुल प्लेइंग 11 मध्ये परतणार का?
याशिवाय, संघात एक बदल अपेक्षित आहे तो म्हणजे केएल राहुलचे पुन्हा पुनरागमन होऊ शकते. तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या जागी शुभमन गिलचा समावेश करण्यात आला होता, गिल दोन्ही डावात आपल्या कामगिरीने छाप पाडू शकला नाही. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन राहुलला पुन्हा संघात समाविष्ट करून स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेऊ शकते.
Prakash Ambedkar मोदी-शाहांना विचारा : टू जी घोट्याळातील आरोपी निर्दोष कसे?
अहमदाबाद कसोटी सामन्यासाठी संभाव्य भारतीयसंघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.