अभिमानास्पद! तिरंदाजीत आदिती स्वामीचा ‘सुवर्ण’ वेध; भारतानं पहिल्यांदाच जिंकलं गोल्ड
World Archery Championship : क्रिकेटच नाही तर आता अन्य खेळांतही भारत चमकदार कामिरी करत आहे. भारतीय खेळाडू विदेशांत जाऊन देशाचा डंका वाजवत आहेत. आताही जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (World Archery Championship) भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. कांस्य, ब्राँझ यानंतर थेट सुवर्णपदकाची कमाई करण्यात यश मिळाले आहे. आदिती गोपीचंद स्वामी हिने ऐतिहासिक कामगिरी केली. वैयक्तिक खेळ प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावले. भारताने वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात पहिलेच सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे हे पदक जास्त महत्वाचे आहे.
#WATCH | "I'm very happy since India never won a gold medal before this (in the World Archery Championship) and I got the chance to bring it in individual and team…We got the gold in team first so I took it as a motivation and performed well in individual event," says Indian… pic.twitter.com/E5DQZWCrYy
— ANI (@ANI) August 22, 2023
या यशानंतर आदितीने प्रतिक्रिया दिली. मी खूप आनंदी आहे. याआधी भारताला कधीही वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक मिळालं नव्हतं. ही संधी मला मिळाली. स्पर्धेत इतकी चांगली कामगिरी होईल हे मलाही अपेक्षित नव्हतं. पण, आता पुढील काळातही अशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहिल. जिंकल्यानंतर मी पहिल्यांदा घरी फोन केला. घरातील सदस्यही माझा खेळ पाहत होते. त्यानंतर मी माझ्या प्रशिक्षकांशी चर्चा केली. सहकारी खेळाडूंनाही भेटले, असे आदिती हिने सांगितले.
Archers World Cup : भारतीय तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद; ‘रिकर्व्ह’ प्रकारात ब्राँझपदकांची कमाई
महिला तिरंदाजांचीही यशस्वी कामगिरी
या स्पर्धेत महिला तिरंदाजांनीही चांगली कामगिरी केली होती. महिला रिकर्व्ह प्रकारात महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पहिल्या फेरीत जपानवर 6-2 अशी मात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इटलीचा 5-1 असा पराभव केला. चीन तैपेई संघावर मात्र मात करता आली नाही. चीन तैपेईने भारतावर 6-0 अशी मात केली. भारत आणि मेक्सिको या देशात 4-4 अशी बरोबरी झाली. पहिल्या दोन सेटमध्ये मात मिळाल्यानंतर महिला तिरंदाजांनी पुढील दोन सेट मात्र जिंकले. पाचव्या सेटमध्ये भारतीय महिलांनी तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत 27 गुणांची कमाई केली. या सेटमध्ये मेक्सिकोला मात्र 25 गुण मिळाले. त्यामुळे या सामन्यात भारताने मेक्सिकोवर मात करत ब्राँझपदक मिळवले.