WTC Final : ओवलचे मैदान भारतासाठी किती लाभदायक?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 14T170537.878

Ind Vs Aus  WTC 2023 Final : भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठत इतिहास रचला आहे. भारताने नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडने श्रीलंकेला क्राइस्टचर्च येथे झालेल्या कसोटी सामन्यात हरवले आहे. त्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहचू शकली. भारताचा् आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 7 जून ते 11 जून 2023  या कालावधीत लंडनच्या ओवल मैदानावर होणार आहे. सलग दोन वेळा टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारी भारतची एकमेव टीम आहे. परंतु पहिल्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडच्या विरुद्ध सामना झाला होता. त्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाकडे पुन्हा एकदा पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम

परंतु भारतीय संघाला विजयासाठी अनेक अडचणी आहेत. लंडनच्या ओवल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल रंगणार आहे. ओवलच्या मैदानावर भारताचा इतिहास हा काही फार चांगला नाही. भारताने या मैदानावर एकुण 14 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर 5 सामन्यात भारताचा पराभव झालेला आहे. उरलेले 7 सामने हे ड्रॉ झालेले आहेत.

IND vs AUS 4th Test: अहमदाबाद कसोटी अनिर्णित: भारताने सलग चौथी मालिका जिंकली, अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला

परंतु असे जरी असले तरी भारताने या मैदानावर खेळलेल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवला होता. भारताने तेव्हा यजमान इंग्लंडचा पराभव केला होता. तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली होता. त्यासामन्यात रोहित शर्माने 127 धावांची खेळी केली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाचा रेकॉर्ड देखील या मैदानावर फार खराब राहिलेला आहे. ऑस्ट्रेलिया या मैदानावर 38 सामने खेळला आहे, त्यापैकी 7 सामने जिंकला आहे तर तब्बल 17 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

Tags

follow us