- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
Maratha Reservation Protest : वाशीत साऊंड सिस्टिमने लावला जरांगेंच्या आवाजाला ‘ब्रेक’
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून निघालेला मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकला आहे. वाशीमध्ये सरकराच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर ते आंदोलकांना संबोधित करण्यासाठी ते दाखल झाले होते. मात्र, उपस्थित शेवटच्या आंदोलकांपर्यंत आवाज जात नसल्याने आता नव्याने साऊंड सिस्टिमची सोय केली जाणार आहे. त्यानंतर दोन वाजता जरांगे पाटील […]
सरकार मराठा बांधवाच्या भावनांशी क्रूर खेळ करतेय; ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत आव्हाडांची सडकून टीका
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. त्यामुळं राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मात्र, या सर्व्हेचा सावळा गोंधळ समोर आला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाबाबत जो सर्व्हे सुरू आहे, त्याबात काहीही माहिती […]
‘मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नाही’; CM एकनाथ शिंदेंनी शब्दच दिला
Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नसल्याचा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून मनोज जरांगे यांची पदयात्रा आता नवी मुंबईत दाखल झाली आहे. जरांगे यांनी आंदोलन न करण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून सरकारच्या प्रयत्नांना अपयश आलं […]
शिंदेंचा दूत लोणावळ्यात दाखल; जरांगेंचं वादळ मुंबईच्या वेशीवरच थांबणार?
लोणावळा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने पुढे पुढे सरकत आहे. येत्या 26 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहे. काल (दि.24) पुण्यात जरांगेंच्या मोर्च्याला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता जरांगेंना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून […]
CM शिंदे रमले शेतात, रोटरही चालवला; म्हणाले, ‘मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो’
Eknath Shinde : मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेताकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले. संयुक्त किसान मोर्चा पुन्हा […]
CM शिंदेंसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या अयोध्या दौऱ्याचा ‘मुहूर्त’ ठरला; आमदार, खासदारही असणार सोबत!
पुणे : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची […]
मनोज जरांगेंचे वादळ मुंबईच्या दिशेने अन् CM शिंदे मूळ गावच्या जत्रेसाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर
पुणे : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाची मागणी करत मुंबईच्या दिशेने निघालेला आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा भव्य मोर्चा आज (24 जानेवारी) मध्यरात्री पुण्यात दाखल झाला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते खराडी भागातून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेने रवाना झाले. तिथून पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे हा मोर्चा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने […]
‘एकनाथ शिंदे खुर्चीसाठी शेपूट हलवतोयं’; एकेरी उल्लेख करीत ठाकरेंची जळजळीत टीका
Udhav Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खुर्चीसाठी शेपूट हलवत असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकमध्ये ठाकरेंनी आयोजित सभेतून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोडच उठवली आहे. शेअर बाजारात हाहाकार! […]
अयोध्येत रामाचं राज्य पण महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य, संजय राऊतांचा नाशिकमधून हल्लाबोल
Sanjay Raut On Narendra Modi : प्रभु श्रीराम सत्यवचनी होते, एकवचनी होते पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. महाराष्ट्राची परिस्थिती आणखी गंभीर आहे. अयोध्येत रामाचं राज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचे राज्य आलं, हे आपलं दुर्देव आहे, असा हल्लाबोल खासदार संजय […]
‘कोण नरेंद्र मोदी, कोण फडणवीस, कोण शिंदे? आजचा ‘रावण’ अजिंक्य नाही’; राऊतांचा महायुतीवर घणाघात
Sanjay Raut : रामाचा निर्धार पक्का होता. ज्या अन्यायाविरुद्ध लढायला मी उभा ठाकलो आहे ती जी लढाई मला लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही तर सामन्य आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढायची आहे. म्हणून रामाचं महत्व शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता पण आज ठिकठिकाणी रावणच रावण […]