गुजरात राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसच आघाडीवर आहे.
आधीच भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
गुजरात भाजपाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. राज्यात असे काही मतदारसंघ आहेत जिथे वर्षानुवर्षे भाजपचेच उमेदवार विजयी होत आले आहेत.