- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
Ajit Pawar अन्य राज्ये येऊन गुंतवणूक पळवून नेतात… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरतात
मुंबई : गेले आठ महिने राज्यात अभूतपूर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, प्रशासकीय अराजकता आहे. राज्याला पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री मंत्रालयाऐवजी, बाहेरंच जास्त फिरतात. प्रशासन ठप्प आहे. राजकीय अस्थितरतेचा विकासप्रक्रियेवर परिणाम होत आहे. मंत्री, सत्तारुढ पक्षाचे नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्ये, वर्तनाने राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत आहे. उद्योग, व्यापार राज्याबाहेर चालले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेशसारखी अन्य राज्ये महाराष्ट्रात येऊन […]
Ajit Pawar यांची निवडणूक आयोगावर टीका… तर राजू पाटील यांना अख्खा ‘मनसे’ पक्ष देणार का?
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचं नाव, चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय आल्यानंतरंच, आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर, लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज, मनसेचे एकमेव आमदार आहेत. उद्या त्यांनी पक्ष सोडला, बंड म्हणा, उठाव म्हणा, तो केला तर अख्खा मनसे […]
Ajit Pawar : माजी मंत्र्यांला अंडरवर्ल्ड मार्फत संपविण्याची भाषा… तरीही ‘ईडी’ सरकार सुस्त!
मुंबई : राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही, मातीमोल दरानं कृषी उत्पादन विकण्याची वेळ, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरु आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, माजी मुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या मार्फत संपविण्याची खुलेआम भाषा सुरु आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत, राज्यातली […]
Ajit Pawar राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त!
मुंबई : राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan), राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यासह इतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचे, मारण्याच्या धमकी दिली जात आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Ajit Pawar यांचा भाजपवर गंभीर आरोप… गुंडांना घेऊनच मंत्री फिरत होते!
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा […]
Ajit Pawar पिंपरी-चिंचवडला पुण्याच्या तोडीस तोड शहर बनवले!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे, कष्टकऱ्यांचे शहर आहे. या भागाचे काम करण्याची संधी ज्यावेळी मला येथील जनतेने दिली. तेव्हा मी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम केले. प्रत्येकाला चांगली पदे दिली. एका महिला भगिनीने तर मला स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या नाहीतर मी जीवच देईन, अशी धमकी दिल्याचा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार […]
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर राम शिंदे म्हणाले…
पुणे : अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या बॅनरबाजीवर भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde)म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची बॅनरबाजी झाली त्यांच्या वाढदिवसालाही अशाच पद्धतीची चर्चा झाली. त्याच्यात बारकाईनं पाहिलं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्या जनार्दन ड्रायव्हरनं, प्रत्येक ड्रायव्हरला (Driver)असं वाटतंच की, माझा मालक मोठा व्हावा पण मोठ्या मालकाला जोपर्यंत वाटत नाही […]
Ajit Pawar Hoarding : ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा’, पोस्टरची सर्वत्र चर्चा
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या मुख्यमंत्री पदाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अनेक आमदार हे जाहीरपणे 2024 साली अजितदादांना मुख्यमंत्री करणार, असे बोलत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या (Mumbai ) कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे पोस्टर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु […]
Ajit Pawar : ठाकरे कुणामुळे ट्रॅपमध्ये अडकले ते कोश्यारींनी स्पष्ट सांगावे
राष्ट्रवादी काँग्रसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे आज पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) येथे होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांच्या मुलाखतीवर भाष्य केले. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये […]
Ajit Pawar : कोश्यारींनी ‘ते’ पत्र पब्लिश करावं, दूध का दूध, पाणी का पाणी होईल
मुंबई : ‘माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे काही 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र आहे ते पब्लिश करावं. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मिडीयाला ही हे पत्र दाखवावं जेणे करून मिडीयाला कळेल की, खरं काय आहे ?’ असं प्रतिउत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरांशी बोलताना कोश्यारी यांना दिलं. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल […]