अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. पण, दादा माझ्यापेक्षा वयाने, पदाने आणि नात्याने मोठे आहेत. मोठ्यांचा आदर सन्मान करायचा असतो तो मी करते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवड केली आहे.
राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल
महादेव अॅप बेटिंग प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
निवडणूक भरारी पथकाकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होता. या तपासणीदरम्यान सोनापूर सिग्नल परिसरात एका वाहनात पैसे सापडले.
दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते.
महर्षी पंचायतन सिद्धपीठम पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
गळ्या राज्याची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. पण आज त्यांच्याच नातवाला तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. या सगळ्या खेळी कुणाच्या आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ही सगळी खेळी जयंत पाटील यांनीच केली.
महायुतीत थांबलो नाही तर तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात होती, असा उत्तम जानकर आरोप त्यांनी केला.
शिवसेनेचे नुकसान करण्याची कोणतीच संधी पवारांनी सोडली नाही. शरद पवार यांनी नेहमीच बाळासाहेबांवर टीका केली. त्यांनी कायमच शिवसेनेचा द्वेष केला.