“भाजप मोठा पक्ष, तडजोडही त्यांनाच करावी लागणार”; शिंदे गटाच्या आमदारानं वाढवला दबाव..
Sanjay Shirsat on Mahayuti Seat Sharing : राज्यातील सत्ताधारी महायुतीत जागावाटपाच्या (Mahayuti Seat Sharing) चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला किती जागा मिळणार याचा निर्णय झालेला नाही. मात्र शिंदे गट आणि अजित पवार गटाने आपला आकडा सांगण्यास सुरुवात केली आहे. जागावाटपात तडजोडी होतीलच मात्र या तडजोडी भाजपानेच कराव्यात असा सूर मित्रपक्षांचा आहे. आता तर शिंदे गटातील नेत्यांनी तसे सांगण्यास सुरुवातही केली आहे. यामुळे भाजपात अस्वस्थता वाढली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat) महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचेच सरकार येणार, मंत्री भुजबळांचा दावा
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabhan Elections) तिकीट वाटपाला उशीर झाला. त्यामुळे आम्हाला प्रचार करण्यासाठी फार वेळ मिळाला नाही. आता मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आले होते. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे आमदार जास्त आहेत. अशा परिस्थितीत त्यांनाच तडजोड करावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो एका बैठकीतून सुटणार नाही. यासाठीच जेपी नड्डा आले होते. त्यांनी जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला, असे शिरसाट म्हणाले.
यानंतर संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार टीका केली. महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी त्यांची सत्ता येणार नाही. त्यांनी कितीही वाट पाहिली तरी पाच वर्षांत त्यांची सत्ता येणारच नाही. केंद्राती एनडीए सरकारही आपला कार्यकाळ पूर्ण करील. कोणत्याही परिस्थितीत एनडीए सरकार पडणार नाही असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही, त्यांचा दौरा केवळ राजकीय स्टंट.. संजय शिरसाटांचे टीकास्त्र