आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली. तर उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल - थोरात
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेयं, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याची टीका माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं. ते लेटस्अप मराठीच्या 'लेटसअप चर्चा' कार्यक्रमात बोलत होते.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत एक ओपिनियन पोल समोर आला. यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीबाबतचा प्रस्ताव दिला असून सप्टेंबरच्या मध्यापर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे.
शरद पवारच काय तर महायुतीच्या नेत्यांच्या मनातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विरोधक चायनीज मॉडेल शिवप्रेमी असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना जोडो मारो आंदोलनावरुन नवीन नाव दिलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
आम आदमी पक्षानेही महाराष्ट्र विधानसभेसाठी शड्डू ठोकला. 'आप'ने परभणीतून सतीश चकोर (Satish Chakor) यांची उमेदवारी जाहीर केली.
छत्रपती संभाजीनगर विमान तळावर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला.
मविआकडून ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार आहे. उबाठाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांवर दावा केला.