महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण सुरु असून नुराकुस्ती सुरु असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलीयं.

Pm Narendra Modi News : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण सुरु असून नुराकुस्ती सुरु असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केलायं. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोलापुरात आयोजित प्रचारसभेतून मोदींनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केलीयं.
महाविकास आघाडीवाले भ्रष्टाचारातील खेळाडू; त्यांना संधी देऊ नका, पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात
पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. महाविकास आघाडीवाले ज्या गाडीवर चालले आहेत, त्या गाडीला ब्रेक नाही. गाडी चालवणार कोण यावरुन मारामारी सुरु आहे. मविआमध्ये आपपसांत वाद करण्यातच वेळ वाया घालवत आहेत. मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण सुरु आहे नुराकुस्ती सुरु असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केलायं.
बॅग तपासली म्हणून इश्यू करू नका, तो पोलिसांचा अधिकार…; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंवर निशाणा
तर महाविकास आघाडीमधील एक पक्ष आपल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्यात व्यस्त तर काँग्रेसवाले त्यांची दावा खोडून काढण्यात व्यस्त आहेत. महाविकास आघाडीचे निवडणुकीआधीच हे हाल आहेत. आघाडीवाले महाराष्ट्राला स्थिर सरकार कधीच नाही देऊ शकतं. काँग्रेसने देशावर अनेक दशके राज्य केलं. समस्या तशाच ठेवणं ही काँग्रेसची कार्यशैली राहिली असल्याची टीका मोदींनी केलीयं.
जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल
तसेच सोलापुरमध्ये सर्वाधिकवेळा येणारा पहिला पंतप्रधान मीच असून सोलापुरच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिलंय. मला आशिर्वाद देण्यासाठी महिला भगिनी मोठ्या संख्येने आल्या आहेत. सोलापुरातील पालखी मार्गाला अनेक अडचणी होत्या, या समस्या सोडवण्याचं काम महायुती सरकारने केलं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलंय.