- Home »
- Manoj Jarange
Manoj Jarange
Manoj Jarange: ‘मुंबईकडे कूच करण्याचा, मनोज जरांगेंनी सांगितला अॅक्शन प्लॅन
Manoj Jarange: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अखेर मुंबई येण्याचा प्लॅन जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनाच्या दरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या अॅक्शन प्लॅन संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईकडे कूच […]
Maratha Reservation : जरांगेच्या पदयात्रेचा नगर जिल्ह्यातील मार्गक्रम ठरला; असे असणार नियोजन
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation ) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता जरांगे हे आता मुंबईकडे आगेकूच करणार आहे. त्यांची ही पदयात्रा नगर जिल्ह्यातून देखील जाणार आहे. त्यानुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातून देखील मोठ्या […]
Prakash Shendage : ‘तुमच्याकडे आंदोलनासाठी 10 लाख गाड्या, तर आमच्याकडे 2 हजार गाढवं-मेंढरं’
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
Maratha Reservation : अखेर मनोज जरांगेंची ‘कुणबी’ची नोंद घावली….
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत अनेकदा आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठीच सरकारने गठित केलेल्या शिंदे समितीला जवळपास 13 हजार पुरावे आढळून आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा अद्याप कुणबी […]
Manoj Jarange : ‘कारवाई करूनच दाखवा मग मराठे सुद्धा’… जरांगेंचं अजितदादांना सडेतोड उत्तर
Manoj Jarange vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यांच्या […]
‘जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर’.. अजितदादांचा जरांगेंना रोखठोक इशारा
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत […]
Chhagan Bhujbal : ‘होय, ओबीसींसाठी 35 वर्षांपासून मला वेड’; भुजबळांनी जरांगेंना ठासून सांगितलं
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद अजूनही कायम आहे. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. भुजबळला वेड लागलं आहे, असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टिकेवर आज भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ आज पुण्यात होते. येथे त्यांनी […]
’60 वर्षांत नाही झालं ते CM शिंदेंच्या आदेशाने सुरु’; शंभूराज देसाईंची टोलेबाजी
Maratha Reservation : मागील 60 वर्षांत नाही झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने गतीने काम सुरु असल्याची टोलेबाजी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं असतानाच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरच खापर फोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही मागील 60 वर्षांचा उल्लेख करीत विरोधकांवर टीका […]
Maratha Reservation : मनोज जरांगेंना मुंबईत यावं लागणार नाही; गिरीश महाजनांनी दिला शब्द
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मुंबईत यावं लागणार नाही, असा शब्दच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला आहे. दरम्यान, येत्या 20 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची पायी दिंडी मुंबईत धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली. या […]
Maratha reservation : ‘सरकारबरोबर चर्चा टाळू नका’; विखे पाटलांच्या वक्तव्यात दडलंय काय?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकार (Maratha Reservation) कोंडीत सापडले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटले असून या विषयावर शासनाशी चर्चेला जाणार नसल्याचा त्यांचा सूर आहे. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षणाच्या बाबतीत लोकभावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीर बाबी सुध्दा […]