- Home »
- PAKISTAN
PAKISTAN
पाकिस्तानचा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक, 8 जणांचा मृत्यू; युद्धासारखी स्थिती, सैन्य आमनेसामने
Pakistan Taliban Attacks : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पुन्हा युद्धजन्य (Pakistan Taliban Attacks) परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानात तालिबान शासन आल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव कमी होईल असे वाटत होते. परंतु, तसे होताना दिसत नाही. या दोन्ही देशांत युद्ध भडकेल की काय अशी चिन्हे आता दिसू लागली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले आहे. पाकिस्तानी […]
Pakistan News : पाकिस्तानात भारताचा आणखी एक शत्रू ठार; 26/11 तील सूत्रधाराचा खात्मा
Pakistan Lashkar Terrorist Dies : मागील काही दिवसांपासून पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये दहशतवाद्यांना (Pakistan News) ठार मारले जात आहे. यातील बहुतांश अतिरेकी भारताचे शत्रू आहेत. या दहशतवाद्यांना मारले जात असले तरी यामागे कारण काय याचा खुलासा झालेला नाही. आताही अशीच एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील फैसलाबाद शहरात लष्कराचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा याचा मृत्यू झाला […]
Pakistan : घोषणा नाही, कारणही नाही तरीही ‘एक्स’ ठप्प; पाकिस्तानात सात दिवसांपासून चाललंय काय?
Pakistan Social Media Shut Down : पाकिस्तानात निवडणुका होऊन पंधरा दिवस (Pakistan) उलटून गेले आहेत तरी सरकार अस्तित्वात आलेले नाही. सध्या येथे मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार (Pakistan Elections) यावर अद्याप निर्णय नाही तर दुसरीकडे लोकांच्या सोशल मीडियावरही (Social Media) बंधने आणण्यात आली आहेत. मागील सात दिवसांपासून देशात ‘एक्स’ (आधीचे ट्विटर) […]
Pakistan Election : नवाज शरीफांना धक्का! ‘या’ तीन मतदारसंघातील निवडणूकच रद्द
Pakistan Election Result : पाकिस्तानात निवडणुका होऊन मतमोजणीही झाली (Pakistan Election Result) आहे. तरीदेखील सरकार स्थापन झालेले नाही. याचं कारण म्हणजे मतमोजणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. जिंकत असलेले उमेदवारही पराभूत घोषित करण्यात आले. पाकिस्तानातील न्यायपालिका आणि निवडणूक आयोगही यात सामील असल्याचा आरोप प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी […]
Pakistan Elections : पाकिस्तानात पुन्हा मतदान! ‘या’ मतदान केंद्रांवर फेर मतदानाची आयोगाची घोषणा
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात मतमोजणी अजूनही संपलेली नाही. दोन दिवसांपासून (Pakistan Elections 2024) मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल आलेला नाही. वारंवार इंटरनेट बंद पडणे, मतमोजणीतील संथपणा, दहशतवादी हल्ले या काही कारणांमुळे निकाल येण्यास उशीर होत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे समर्थित उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. अशातच आता आणखी […]
PM मोदींच्या आठ खासदारांसोबत स्पेशल लंच… पाकिस्तानचा किस्सा केला शेअर
Pakistan Elections : दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाचा निवडणुकीत पराभव; फक्त ‘इतकी’ मते मिळाली
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Elections 2024) मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी होऊन निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे समर्थित बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. तर नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्यासह बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांच्या पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे. या […]
Pakistan : पाकिस्तानात महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ‘मोठ्ठी’ वाढ
Pakistan News : आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पाकिस्तानात लवकरच (Pakistan Elections) निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच पाकिस्तानात महागाईने हाहाकार (Pakistan Inflation) उडाला आहे. आताही पुन्हा एकदा इंधनाच्या दरात (Fuel Price) वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. या नव्या […]
पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ: इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा, माजी परराष्ट्रमंत्र्यांनाही शिक्षा
Imran Khan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे संस्थापक इम्रान खान यांच्याविरोधात ही कारवाई सायफर प्रकरणात करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, इम्रान खान व्यतिरिक्त देशाचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही या प्रकरणात […]
पाकिस्तानात घमासान! ‘बलूच आर्मी’चा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; 10 ठार, 2 शहरांवर कब्जा
Pakistan News : चीनच्या मदतीने पाकिस्तानातील अशांत (Pakistan News) बलुचिस्तान प्रांतात धुडगूस घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) बलुचिस्तानातील (Balochistan) माच आणि बोलन शहरातील सैन्याच्या ठिकाणांवर एकापाठोपाठ हल्ले केले. यानंतर ही शहरे ताब्यात घेतल्याचा दावा आर्मीने केला. या हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर […]