इस्त्रायलच्या विरोधात पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव; भारतानेही घेतला ‘हा’ मोठा निर्णय

इस्त्रायलच्या विरोधात पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव; भारतानेही घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध अजूनही सुरुच (Israel Hamas War) आहे. या युद्धात इस्त्रायलचेही मोठे नुकसान झाले आहे. पॅलेस्टाइनलाही युद्धाचा मोठा फटका बसला आहे. आता युद्धासाठी इस्त्रायललाच जबाबदार धरावे अशी मागणी करणारा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात आला होता. गाझामध्ये इस्त्रायलने युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्ध अपराध केला आहे यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे असे या प्रस्तावात म्हटले होते. मात्र, या प्रस्तावापासून भारताने चार हात दूर राहणेच पसंत केले. आयओसीमार्फत पाकिस्तानने हा प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाच्या बाजूने 28 देशांनी मतदान केले तर 6 देशांनी विरोधात मतदान केले. तर भारतासह 13 देशांनी दूर राहणे पसंत केले.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये ट्विस्ट! बाबर आझम पुन्हा कॅप्टन; ‘या’ खेळाडूला कर्णधारपदावरून हटवले  

या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या देशांत अमेरिका आणि जर्मनी यांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत एकूण 47 देश आहेत. या प्रस्तावात असेही म्हटले होते की इस्त्रायलला हत्यारे आणि अन्य सैन्य उपकरणांची विक्री बंद करण्यात यावी. इस्त्रायली सैन्याद्वारे गाझात केल्या गेलेल्या युद्ध अपराधांसाठी इस्त्रायललाच जबाबदार धरण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार आयओसीमार्फत पाकिस्तानने हा प्रस्ताव आणला होता. या युद्धात इस्त्रायल दोषी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आयीओसीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानकडूनही इस्त्रायलवर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र पाकिस्तानचे मनसूबे अजून पूर्ण झालेले नाहीत. इस्त्रायलला अमेरिका आणि युरोपातील देशांचा पाठिंबा आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या मागणीला काही किंमत राहिलेली नाही.

इस्त्रायलने हमास या दहशतवादी संघटनेचा पूर्ण बिमोड करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांकडून दबाव टाकला जात असला तरी त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. गाझा भागात इस्त्रायलकडून सातत्याने ह़ल्ले केले जात आहेत. त्यामुळे या भागात अजूनही तणाव कायम आहे.

Israel Hamas War : लेबनॉनवरील कारवाई महागात! इस्त्रायलवर 100 रॉकेट डागत मोठा हल्ला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज