- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
निवडणुकीच्या तोंडावर धाडसत्र सुरूच; लवासाचे मालकही ईडीच्या रडारवर, दिल्ली, मुंबईसह गोव्यात धाडी
ED raid on Lavasa Owner : देशात सध्या एकीकडे लोकसभा निवडणुकांचं वातावरण असताना त्यातच विरोधकांवरील इडी कारवायांचं सत्र देखील जोरात सुरू आहे. त्यात आता शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या लवासा प्रकल्पाचे मालक अजय सिंह ( ED raid on Lavasa Owner ) हे देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. लवासाचे मालक सिंह यांच्या डार्विन या कंपनीसह इतर […]
…तर मी बारामतीसाठी ‘कमळ’ हाती घेणार; शिवतारेंच्या भूमिकेनं अजितदादा ‘चेकमेट’ होणार
बारामती : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंनी मोदींच्या विजयासाठी वेळ पडल्यास हाती […]
Sharad Pawar : कारवाईचा फायदा केजरीवालांनाच, भाजपच्या ‘त्या’ दोन जागाही येणार नाही; पवारांचा घणाघात
Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राज्यात शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, या कारवाईचा केजरीवाल यांनाच फायदा होईल. त्यांच्या शंभर टक्के जागा निवडून येतील. गेल्यावेळी दिल्लीत भाजपला केवळ दोन […]
Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेनंतर पवारांचा संताप, म्हणाले, निवडणुका आल्यानंतर…
Sharad Pawar : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. या घटनेनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]
वय नाही तर जिद्द महत्त्वाची, पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका केली. शरद पवारांना टोमणे मारण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. पवारांवर टीका टिप्पण्या करत कधी त्याचं वय काढलं, तर कधी निवृत्त होण्याचे सल्ले दिले. अलीकडेच अजित पवारांनी शरद पवारांचे वय झालंय, त्यांनी […]
‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट नाही’; पवारांच्या बहिण सरोज पाटलांनी थेट सांगितलं
Saroj Patil : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम (Lok Sabha Election) सुरू आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. यंदा बारामती मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. कारण ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची आहे. राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. गट फुटला म्हणून कुटुंबात फूट पडलेली नाही. या राजकारणाचा पवार कुटुंबावर कोणताही परिणाम होणार […]
अजितदादा मित्र मंडळ SC चा निर्णय बदलणार का? ‘चिन्हा’च्या वापरावर रोहित पवारांचा सवाल
Rohit Pawar On Ajit Pawar Group : अजित पवार (Ajit Pawar) मित्र मंडळ आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलणार का? असा खडा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटद्वारे केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हाच्याखाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार एक नोट लिहिलं अनिर्वार्य असतानाही अजित पवार गटाकडून या निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यावरुनच रोहित […]
‘कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाही’; भावासाठी बहिण मैदानात, चंद्रकात पाटलांना उत्तर
Saroj Patil On Chandrakant Patil : कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत, शरद पवार निवडणुकीत पडू शकत नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. दरम्यान, शरद पवार यांचा पराभव महत्वाचा असल्याचं विधान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant pati) यांनी केलं होतं. […]
Jayant Patil : ‘मी निलेश लंकेंना तुतारी दिली, पुढील आवश्यक सोपस्कार योग्यवेळी पूर्ण करणार’
Jayant Patil On Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency)महाविकास आघाडीचा (MVA)उमेदवार अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यावर अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्याबद्दल आमदार निलेश लंके यांच्याकडून किंवा राष्ट्रवादी शरद […]
पवारांनी भाकरी फिरवली; धनुभाऊंचा खास माणूसच पंकजांचा पेपर अवघड करणार!
बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजांचा विजयी मार्ग सोपा असेल अशी चर्चा आहे. मात्र, निवडणुकांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पेशल डाव टाकत भाकरी फिरवण्याची किमया करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या डावामुळे पंकजांपाठोपाठ बीड लोकसभेचा पेपर सोडवताना महायुतीतील नेत्यांचा चांगलाच कसं लागणार असल्याचे चित्र आता […]