‘कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाही’; भावासाठी बहिण मैदानात, चंद्रकात पाटलांना उत्तर
Saroj Patil On Chandrakant Patil : कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत, शरद पवार निवडणुकीत पडू शकत नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. दरम्यान, शरद पवार यांचा पराभव महत्वाचा असल्याचं विधान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant pati) यांनी केलं होतं. त्यावर बोलताना सरोज पाटील भावासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आल्या आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या बोलत होत्या.
सरोज पाटील म्हणाल्या, शरद पवारांचा पराभव करणं हेच विरोधकांचं ध्येय आहे. विरोधकांकडून सारखे खोटेनाटे आरोप होत असतात. शरद पवारांबद्दल वाटेल ते बोलत अससता. पण शरद पवार यांच्यावर जनतेचं प्रेम आहे. मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. शरद पवारांसोबत गोरगरीब जनता असते. लोकं त्यांचं काम ओळखतात. कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाही, शरद पवार निवडणुकीत पडू शकत नाही, असं प्रत्युत्तर सरोज पाटील यांनी दिलं आहे.
अदा शर्माच्या ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ची चार दिवसांतच बिकट अवस्था, जाणून घ्या कलेक्शन
तसेच आमची आई एनडी पाटलांनाही सातवा मुलगा समजायची. आम्ही चार बहिणी सात भाऊ हे वडाचं झाडं आहे. आमच्यावर आईवडिलांनी चांगले संस्कार केलेले आहेत. लोकांना वाटत असलं तरीही माझं कुटुंब फुटू शकत नाही ते एक होतीलच. एनडी पाटील वेगळ्या पक्षाचे डाव्या पक्षाचे शरद पवार वेगळ्या पक्षाचे होते तरीही कुटुंब फुटलं नाही. आमच्या घरात विचार स्वातंत्र्य आहे 101 टक्के कुटुंब फुटणार नाही लोकं विचार करुन उत्तर देणार असल्याचंही पाटील म्हणाल्या आहेत.
Government Schemes : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
बारामती लोकसभेत मला आणि भाजप कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. तसंच शरद पवार यांचा पराभव करणं, आमचं एवढं एकच ध्येय आहे. आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात. सध्या आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो, असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते.