- Home »
- Shivsena
Shivsena
लोकसभेच्या आखणीत ठाकरेंची सावध पावलं : पवारांशी मैत्री जपण्यासाठी दोन ‘विश्वासूंवर’ खास जबाबदारी
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 10 शिलेदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या दहा नेत्यांची महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, आमदार रवींद्र वायकर, सुनिल प्रभू आणि भास्कर […]
“एकनाथ शिंदे पाकीट पोहचविणारा माणूस” : ठाकरेंवर टीका करताना राणे हीट विकेट
सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदे पाकीट पोहचविणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडावे, निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. पण यातून शिंदे हे पोहचविणाऱ्यांपैकी एक आहेत, असे म्हणत नारायण राणे […]
इंग्रजी बोलताना अडखळले अन् फसले! बनावट कागदपत्रांच्या आधारे युकेला जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बनावट कागदपत्रांच्या आधारे लंडनला (London) निघालेल्या आठ जणांना अटक केली आहे. मर्चंट नेव्हामध्ये भरती होण्यासाठी लंडनला निघाल्याचा दावा या आठ जणांनी केला होता. मात्र इंग्रजी बोलता न आल्याने तपास अधिकाऱ्यांचा संशय बळावला, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले. दिलवर सिंग, सुभम सोम नायपाल सिंग, मनदीप सिंग, कैशदीप […]
Ajit Pawar : मी लेचापेचा नाही, मला राजकीय आजार होत नाही; अजितदादांकडून विरोधकांचा समाचार
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आजारपणावरून होणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ […]
Uddhav Thackeray : ‘2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’.. ठाकरे गटाची खोचक टोलेबाजी
Uddhav Thackeray : देश आणि राज्याच्या राजकारणात सध्या ‘पनौती’ हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. कोण कुणाला पनौती आहे यावरून खोचक टोलेबाजी सुरू आहे. याच शब्दाचा आधार घेत उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनातून मोदी सरकावर खोचक फटकेबाजी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांना पनौती म्हटले व पनौती या शब्दाचे विश्लेषण केले. पनौती म्हणजे […]
Uddhav Thackeray : आता जुगार बचावो मंत्रालय तर सुरू होणार नाही ना? ठाकरे गटाचा खोचक टोला
Uddhav Thackeray : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील एका फोटोने राजकारणात गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असताना आता सामनातूनही ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपाचे कुळे यांची मुळे मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपाचे दुधखुळे करत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवू […]
‘घटनाद्रोह्यांना सुतासारखे करायला तुम्ही हवे होता!’ बाळासाहेबांना मानवंदना देत ठाकरे गटाचा भाजपवर प्रहार
Uddhav Thackery : देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. देशात अराजकाचा स्फोट होईल पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत. एकेकाळी बाळासाहेब तळमळीने म्हणाले होते, ज्यांना देशाचे संविधान व कायदे मान्य नसतील त्यांनी सरळ […]
श्रीराम तोंडी लावायला आणि बसायचं कॉंग्रेसच्या पंगतीला; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका
Chitra wagh : सध्या मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांची लगबग सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलतांना गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला आश्वासन दिलं. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यावर भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन दिले जाणार आहे. त्याचा खर्च भाजप सरकार उचलेल, असे शाह म्हणाले होते. यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केलं होतं. जय […]
Uddhav Thackeray : मोदी-शहांसाठी नियमात बदल केला का? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
Uddhav Thackeray : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. जोरदार प्रचार सुरू आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचा निवडणुकीतील प्रचार आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभारावर जोरदार टीका केली. यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपने आचारसंहितेचा भंग केला आहे का? मोदी-शहांसाठी काही […]
अद्वय हिरेंना अटक अन् मालेगावची विधानसभा : राऊतांनी सांगितला दादा भुसेंचा ‘राजकीय प्लॅन’
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hirey) यांंच्यावरील अटकेची कारवाई म्हणजे राजकीय दबावतंत्र आणि सुडाचा प्रकार आहे. त्यांच्यावरील आरोप हे ते भाजपमध्ये (ऱ असतानाही होते. मात्र उद्धव ठाकरेंसोबत आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यामागे त्यांनी मालेगावची विधानसभा निवडणूक लढू नये यासाठी झालेले प्रयत्न आहेत. तिथल्या मंत्रिमहोदयांनी पराभवाच्या भीतीने शासकीय […]