मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
वडिल आणि मुलगा दोघेही मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले, दोघांनाही खासदार म्हणून संधी, केंद्रीय मंत्रीपदी दोघांचीही वर्णी असे असताना कोणी काॅंग्रेस पक्ष सोडला तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काॅंग्रेसवाले असाल तर त्यांना गद्दार म्हणाल आणि भाजपवाले असाल तर त्यांनी चांगली संधी शोधली, असे उत्तर असेल. तर विषय तुमच्या लक्षात असेलच. मिलिंद देवरा यांचा शिवसेना प्रवेश. काॅंग्रेसचा […]