शेवगाव : बालमटाकळीचे ग्रामदैवत श्री बालंबिका देवी यात्रोत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. बालंबिका देवीच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. या भाविकांना मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेता यावा. यासाठी यंदाही मोफत सर्व रोग निदान महाशिबीर राबवण्यात येणार असल्याची माहिती व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन कृष्णा मसुरे यांनी दिली आहे. […]