Deepak Kesarkar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून (mahayuti) राज्यातील 45 लोकसभा जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतील नेते उमेदवारांसाठी अनेक प्रचार सभा, पत्रकार परिषद घेताना दिसत आहे. आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले […]
Sangali Loksabha Constituency : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरेंसोबत असलेल्या पाचही खासदारांना त्यात स्थान मिळाले. निष्ठावंतांना संधी मिळाली. नवीन चेहरेही त्यामुळे शिवसेनेला मिळाले. पण दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ चोळण्याचे काम या यादीने केले आहे. ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास […]
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार याचे उत्तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर देखील अद्यापही गुलदस्त्यात आहे. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटताना दिसत आहे. मात्र या गोष्टीला महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष […]
Anil Desai Summoned: ऐन निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या (UBT) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (EOW) शाखेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना (Shiv Sena) घोषित केल्यानंतरही ठाकरे गटाने शिवसेनेच्या खात्यातून पक्षनिधी […]