ठरलं, ठाकरेंची शिवसेना 22 जागा लढवणार! शिलेदारांची नावेही आली समोर

ठरलं, ठाकरेंची शिवसेना 22 जागा लढवणार! शिलेदारांची नावेही आली समोर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार याचे उत्तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर देखील अद्यापही गुलदस्त्यात आहे. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटताना दिसत आहे. मात्र या गोष्टीला महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष काहीसे अपवाद ठरले आहेत. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party has decided its candidates for 22 Lok Sabha seats.)

‘दिल्लीच्या बादशाहाच्या पाया पडायला गेले असतील’; राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर दानवेंचा खोचक टोला

जागा वाटपाचा हा घोळ मार्गी लागण्यापूर्वीच भाजपने आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने इतर पक्षांपेक्षा मोठी आघाडी घेतली आहे. एका बाजूला भाजपने 20 उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 22 जागांवरचे उमेदवार निश्चित केले आहेत. थोडक्यात ठाकरे यांच्या शिवसेनेने यंदा महाविकास आघाडीत सर्वाधिक म्हणजेच 22 जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचे या जागांवरील त्यांचे शिलेदारही अंतिम झाले आहेत.

पाहुयात कोण आहेत हे 22 शिलेदार…

ठाकरे यांच्या शिवसेनेने पाच विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. तर 15 संभाव्य उमेदवारांच्या यादीलाही अंतिम स्वरुप दिल्याचे समजते. याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान खासदारांमध्ये दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, ठाण्यातून राजन विचारे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत, धाराशिव मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर आणि परभणी मतदारसंघातून संजय उर्फ बंडू जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यासोबतच हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यावर एकमत झाले आहे, तर अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबडेकर यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे.

संध्याकाळपर्यंत निर्णय सांगा अन्यथा आमचं तर ठरलंय; ‘मविआ’चा ‘वंचित’ आघाडीला अल्टिमेटम !

याशिवाय उत्तर पूर्व मुंबईमधून संजय दिना पाटील, उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य मुंबईमधून माजी खासदार अनिल देसाई, रायगडमधून अनंत गिते, मावळमधून संजोग वाघेरे, हिंगोलीमधून नागेश पाटील-आष्टीकर, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे, शिर्डी मतदारमधून भाऊसाहेब वाकचौरे, बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिममधून संजय देशमुख, नाशिकमधून विजय करंजकर, पालघरमधून भारती कामडी, कल्याणमधून सुषमा अंधारे, जालना संजय लाखे पाटील अशी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube