संध्याकाळपर्यंत निर्णय सांगा अन्यथा आमचं तर ठरलंय; ‘मविआ’चा ‘वंचित’ आघाडीला अल्टिमेटम !
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. तरी देखील (Lok Sabha Election) महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार की नाही याबाबतही अजून स्पष्ट नाही. वंचित बहुजन आघाडीने (VBA) दिलेला प्रस्ताव महाविकास आघाडीला मान्य नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा चार जागांचा प्रस्ताव वंचितला मान्य नाही. त्यामुळे जागावाटप रखडले आहे. दोन दिवसांपूर्वी मविआ नेत्यांच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला कोणताही नवा प्रस्ताव द्यायचा नाही असे ठरले होते. त्यानंतर आता मविआने थेट अल्टिमेटमच दिला आहे.
प्रकाश आंबेडकर जर सोबत (Prakash Ambedkar) आले तर त्यांना किती जागा द्यायच्या हे ठरलं आहे. जर ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविना महाविकास आघाडीचे जागावाटप ठरल्याची माहिती समोर येत आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमचा जो काही निर्णय असेल तो कळवा, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढणार आहोत असा अल्टिमेटम महाविकास आघाडीने दिल्याचे समजते.
Prakash Ambedkar : लेखी देण्यास राऊतांचा नकार, निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाणार नाही, खात्री द्या
वंचित बहुजन आघाडी जर सोबत आली नाही तर 22-16-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला राहिल. यानुसार ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवार गट 10 जागांवर लढतील अशी शक्यता आहे. जर वंचित आघाडी सोबत असे 20-15-9-4 असा फॉर्म्युला राहिल. ठाकरे गट 20, काँग्रेस 15, शरद पवार गट 9 आणि वंचित आघाडी 4 असा फॉर्म्युला राहिले असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसकडून प्रत्येकी एक जागा वंचित आघाडीला देण्यात येईल. परंतु, हा प्रस्ताव वंचितच्या नेत्यांनी आधीच नाकारला आहे.
पराभूत होणाऱ्या जागा देऊन बोळवण केली जात असल्याचा दावा या नेत्यांनी केला आह. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यानंतर मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या चर्चा अद्याप प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. वंचित आघाडी महाविकास आघाडीतील सहभागाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले !