Airtel Down: मोठी बातमी, अनेक शहरांमध्ये एअरटेल सेवा बंद

Airtel Down : देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेल नेटवर्क (Airtel Down) बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. डाउनडिटेक्टरच्या आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनुसार 56 टक्के एअरटेल वापरकर्त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनशी संबंधित समस्यांची तक्रार केली आहे.
दुपारी 3.30 वाजल्यापासून ही नेटवर्क समस्या झपाट्याने वाढली आणि आतापर्यंत 3000 हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या असल्याची माहिती आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मने दिली आहे. प्रभावित शहरांमध्ये दिल्ली, सुरत, मुंबई, हैदराबाद, नागपूर, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि इतर मोठी शहरे समाविष्ट आहेत.
एअरटेलने या परिस्थितीवर एक निवेदन जारी केले आहे की- “आम्हाला सध्या नेटवर्क आउटेजचा सामना करावा लागत आहे. आमची टीम ही समस्या सोडवण्यासाठी आणि लवकरच सेवा पुनर्संचयित करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. धन्यवाद – टीम एअरटेल.”, मात्र काही मिनिटानंतर एअरटेलकडून ही पोस्ट हटवण्यात आली .
मतचोरी प्रकरण, विरोधक आक्रमक; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी
तर दुसरीकडे हजारो संतप्त वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर तक्रारी नोंदवल्या. अनेकांनी मीम्स आणि व्यंग्यात्मक पोस्टद्वारे आपला राग व्यक्त केला. अचानक झालेल्या या बंदमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे.
#Airtel down for many users, telecom giant says working to resolve the issue. Airtel experienced widespread network outages across India on Monday, impacting mobile data and voice services, with over 2,300 reports of disruptions logged by 4:04 PM on Downdetector. @airtelnews pic.twitter.com/BJdHA59N76
— Grijesh Kumar (@imgrijesh) August 18, 2025