Political Crisis : दोन मिनिट बोलूद्या… बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषणापासून रोखलं

Political Crisis : दोन मिनिट बोलूद्या…  बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषणापासून रोखलं

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja Munde) या मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यातच एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पंकजा मुंडेंना भाषण करण्यापासून रोखले. यामुळे मुंडे आणि भाजपात काहीशी नाराजीचा सुरु अद्यापही कायम असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेवराई येथे जाहीर सभा घेतली. मात्र यावेळी व्यासपीठावर घडलेल्या एका प्रसंगाने मुंडे आणि भाजपचा अंतर्गत नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?
आयोजित सभेत सुरुवातीला स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर भाषणासाठी पंकजा मुंडे यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी मी भाषण करतो, मग तुम्ही भाषण करा, असं सांगितलं.

मात्र बावनकुळेंच्या या वक्त्यावर नाराज होत पंकजा मुंडे यांनी असा प्रोटोकॉल नाही म्हंटले. तसेच प्रोटोकॉलनुसार अध्यक्षांचं भाषण शेवट व्हावं, त्यामुळे मी आधी भाषण करते, असं म्हटलं. मात्र अखेर बावनकुळे यांनी स्मितहास्य करत आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि पंकजा मुंडे पुन्हा आपल्या जागी जाऊन बसल्या.

बावनकुळेंचे भाषण संपल्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणातून भाजप उमेदवार किरण पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube