Eknath Shinde : जिथे महाराजांचा अपमान झाला, तिथेच शिवजयंती साजरी केली

Eknath Shinde : जिथे महाराजांचा अपमान झाला, तिथेच शिवजयंती साजरी केली

नवी दिल्ली : दिल्लीतील आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. महाराजांचा अपमान करण्याची कोणाची हिम्मत नव्हती. शिवाजी महाराजांनी देखील त्यावेळी प्रत्युत्तर दिले होते. जिथे महाराजांचा अपमान केला आज त्याच ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरा करीत आहेत. यासारखे दुसरे सौभाग्य नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवजयंती समारोहात केले.

आपल्या सर्वाच्या आयुष्यात आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. याच ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित स्वाराज्यात दाखल झाले हा इतिहास आहे. तेव्हा अपमान झाला त्याचा बदला आज आपण घेतला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे शिवजयंती साजरा करण्याची परवानगी दिल्याबद्दल आभार मानले.

दिल्लीतील ऐतिहासिक आग्रामधील लाल किल्ल्यात आज शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरा झाला. यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने यासाठी परवानगी दिली होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’अशी ओळख असणारे शिवराय हे पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube