‘Gopichand Padalkar हे चॉकलेट बॉय’, Rohit Pawar यांचा टोला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (72)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  युवा नेते व आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar )  यांच्यावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत, असे म्हणत त्यांनी पडळकरांना टोला लगावला आहे. एसटी आंदोलनावरुन  दोन नेते स्वत: च्या मिरवणुका काढूण घेत असतात, अशी टीका त्यांनी केली आहे.

(आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर Pawan Khera यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा !)

गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी ट्विट करत शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. ‘उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल’, अशा शब्दात त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या त्यांच्या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिले आहे.

राज्यामध्ये दोन चॉकलेट बॉय आहेत. ते एसटीच्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात, तिथे रात्र-रात्र झोपतात. तसेच एमपीएससीच्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात तिथे देखील रात्रभर झोपतात. स्वत:चा सत्कार करतात, स्वत:ची मिरवणूक काढतात. पण साधा जीआर मात्र काढू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांनी केलेले ट्विट हे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी असते, अशा शब्दात त्यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका  केली आहे. तसेच शरद पवारांच्या नादी राजकीय दृष्ट्या कोणी लागू नये, नाही तर त्यांचे उद्या काय होईल  हे आम्ही उद्याच ठरवू, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.

Tags

follow us