…तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांचं विरोधकांना इशारा

…तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांचं विरोधकांना इशारा

पुणे : मी जे बोललोयं ते चुकीचं असल्याचं पटवून द्या, राजकारण सोडून देणार असल्याचं चॅलेंज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांना दिलंय. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेते पद दिलेलं नसून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी दिल्याचं रोखठोक प्रत्युत्तरही त्यांनी दिलंय. ते पुण्यात आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी कोणत्याही महापुरुषांबद्दल कधीच वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही, महापुरुषांबद्दल राज्यपालासंह भाजपचे आमदार प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, गोपीचंद पडळकर, रावसाहेब दानवे, यांनी जे काही वक्तव्ये केलेली आहेत.

त्यांच्यावर कोणीच काही बोलत नाहीत. वादग्रस्त वक्तव्यावर ते माफी मागत नाहीत. त्यांच्यावर भाजप कधी कारवाई करणार असल्याचा सवाल अजित पवारांनी केला आहे. विधीमंडळातील माझ्या वक्तव्यानंतर भाजपने माझ्याविरोधात आंदोलने करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. माझ्या वक्तव्यानंतर अजित पवार कुठे? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. माझी आठवण एवढी का येतेयं, असंही ते विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत. मला जे वाटतंय ती भूमिका मी तुमच्यासमोर मांडत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असून बाकीच्यांनी मला शिवकण्याचं काम नाही. त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी. मी माझी भूमिका घेत आहे. भाजपकडून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं सुरु आहे. याबाबतचं नियोजन दोन दिवसांपूर्वी सुरु असतं. या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड मात्र, बाहेरच असतो. त्यांच्या कल्पनेतून हे सगळं पुढं आलं त्यानंतर आदेश आला. आदेशात आंदोलने करा, पुतळे जाळा, असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. फक्त उद्घाटन झालंय, त्यानंतर पुढे काहीच झालं नाही. त्यावेळी भुमिपूजनासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. एखाद्या मंदिराचा जर जिर्णोध्दार केला तर तिथे जाण्याचा लोकांचा कल वाढतो. त्यामुळेच मी स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाठपुरावा केला. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आणि पुरस्कारासाठी स्थगिती दिली की काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मी कोणत्याही महापुरुषांबद्दल वादग्रस्त बोललो नसून भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्ते विधाने केलेली आहेत. त्यांनी केलेल्या विधानांबद्दल आंदोलकांनी मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे, की त्यांच्या नेत्यांची वक्तव्ये चुकीची की बरोबर. आपल्या सद्सदविवेक बुध्दीने त्यांनी विचार करायला हवा, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज काही एका धर्माचे नव्हते, स्वराज्यामध्ये शौर्य, धर्म, समाज, संस्कृती आणि स्वराज्यनिर्मिती सगळं येतं. मी जे बोललो आहे ते चुकीचं आहे असं मला पटवून द्या, मी राजकारण सोडून देणार असल्याचं चॅलेंज यावेळी अजित पवार यांनी दिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube